Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gokul Milk Union Election 2026: कोणाची सत्ता येणार? ‘गोकुळ’च्या 25 जागांसाठी निवडणूक; 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला निकाल

Gokul Milk Union Election 2026: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 25 जागांसाठी 18 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 19 ऑक्टोबरला मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 09, 2026 | 06:14 PM
कोणाची सत्ता येणार? ‘गोकुळ’च्या 25 जागांसाठी निवडणूक; 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला निकाल (फोटो सौजन्य-ChatGPT)

कोणाची सत्ता येणार? ‘गोकुळ’च्या 25 जागांसाठी निवडणूक; 18 ऑक्टोबरला मतदान, तर 19 ऑक्टोबरला निकाल (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
  • 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला निकाल
  • ‘गोकुळ’साठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि राजकीय क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. गोकुळच्या 25 जागांसाठी 18 ऑक्टोबर रोजी मतदान, तर दुसऱ्याच दिवशी 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले यांनी बुधवारी (9 सप्टेंबर) निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली.(Gokul Milk Union Election 2026)

15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 15, 16, 17, 21 आणि 22 सप्टेंबर या पाच दिवशी इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. तसेच दाखल झालेल्या अर्जांची 23 सप्टेंबर रोजी छाननी केली जाणार आहे. त्यानंतर 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

Gokul Election: गोकुळ निवडणुकीत महायुतीचा दावा; ‘२५-०’ मतांनी सत्ता मिळवणार

25 जागांसाठी रंगणार लढत

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळातील एकूण 25 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अंतिम उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे. 18 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होईल आणि गोकुळवर पुढील पाच वर्षे कोणाचे वर्चस्व राहणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

कोल्हापूरच्या राजकारणात हालचालींना वेग

गोकुळ हा केवळ दूध उत्पादकांचा सहकारी संघ नसून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र मानला जातो. त्यामुळे गोकुळची निवडणूक ही सहकार क्षेत्राबरोबरच जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीत कोणते गट एकत्र येणार, कोणाची कोणासोबत आघाडी होणार आणि कोणते पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

प्रशासक नियुक्तीवरूनही झाला होता वाद

गोकुळच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर प्राधिकृत अधिकारी मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीला तत्कालीन सत्ताधारी गटाकडून विरोध करण्यात आला होता. आता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे संघावरील वर्चस्वासाठी राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्यापासून माघारीपर्यंतचा महत्त्वाचा कार्यक्रम: 15 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होतील, 23 सप्टेंबरला छाननी, 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर अर्ज माघारी, 18 ऑक्टोबर मतदान आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

Gokul Milk : दूध भेसळविरोधी कारवाईचा गोकुळला फायदा? दररोज 2 लाख लिटर दुधाची अतिरिक्त मागणी; हसन मुश्रीफांचा दावा

Web Title: Gokul milk union election 2026 voting on october 18 kolhapur cooperative politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Election
  • kolhapur

संबंधित बातम्या

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल
1

SIR Form Controversy: SIR फॉर्म प्रकरणावरून खळबळ! मतदारांचे SIR फॉर्म सफाई कर्मचाऱ्याकडे कसे? तेजस्वी पाटील यांचा गंभीर सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.