Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठ्या अपेक्षेनं अन् विकासाची हमीने भाजपात गेलो पण…; गोपालदास अगरवाल यांचा घरवापसीनंतर निशाणा

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्याचपार्श्वभूमीवर विविध पक्षातील नेत्यांचे पक्षांतर वाढले आहे. आता गोंदियामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी भाजपची साथ सोडत कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. यानंतर त्यांनी भाजप पक्षांवपर जोरदार निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 13, 2024 | 04:46 PM
Gopaldas Aggarwal BJP Gondia

Gopaldas Aggarwal BJP Gondia

Follow Us
Follow Us:

गोंदिया : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी सर्व पक्षांची उमेदवार चाचपणी आणि जागांची जुळवाजुळवी सुरु आहे. दरम्यान, भाजपला गोंदियामध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. कॉंग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचा निर्णय जाहीर करताच गोपालदास अगरवाल भाजपवर आगपाखड केली आहे.

काय म्हणाले गोपालदास अगरवाल?

2019 च्या विधानसभा निवडणूकीपूर्वी गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यावेऴी त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र एकाच टर्मनंतर माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी पुन्हा एकदा घरवापसीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेश निश्चित झाल्यानंतर गोपालदास अगरवाल यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गोपालदास म्हणाले की, “पाच वर्षांपूर्वी मी मोठ्या अपेक्षेनं व या भागाच्या विकासाची हमी घेऊन भाजपात गेलो होतो. पण आमच्याकडच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच भाजपाचा पराभव करण्याचं काम केलं. तरीही मी गेल्या पाच वर्षांत इमानेइतबारे भाजपाचं पूर्ण निष्ठेनं काम केलं,” असे मत गोपालदास अगरवाल यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, लोकसभा निवडणुकांमध्येही मी गोंदियात न भूतो न भविष्यती असं मोठं मताधिक्य भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्याचं काम केलं. पण तरीही गेल्या ५ वर्षांत भाजपामध्ये माझ्याप्रती विश्वास व सहकार्याची भावना मला खूप कमी दिसली. माझ्यासमोर उभे राहिलेल्या बंडखोर आमदारांना भाजपा सरकारची पूर्ण साथ मिळत आहे. त्यामुळे मला वाटतं की या भागात फक्त लूट चालू आहे. कोणताही चांगला उपक्रम इथे सुरू होऊ शकला नाही. आमच्याकडच्या सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचं कोणतंही काम झालं नाही,” असा गंभीर आरोप गोपालदास अगरवाल यांनी भाजप पक्षावर केला आहे.

कॉंग्रेसच्या विजयावर विश्वास

पुढे गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “माझी एकच मागणी आहे की काँग्रेसनं गोंदियातून लढायला हवं. मविआच्या सर्व घटक पक्षांनी गोंदियात विजय मिळावा यासाठी काँग्रेसला उमेदवारी दिली पाहिजे. मीही इच्छुक असणार आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य आहे. पाच वर्षांपूर्वी माझ्यामुळेच काँग्रेसला आमच्या विधानसभा क्षेत्रात, गोंदिया जिल्ह्यात फटका बसला होता. त्यामुळे मी परत काँग्रेसमध्ये येत असताना खर्गे, नाना पटोले यांच्याकडून खात्री घेतली आहे की गोंदियातून काँग्रेस निवडणूक लढणार. उमेदवार कुणीही असो. गोंदिया हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यावेळी आम्ही मोठ्या मताधिक्याने काँग्रेससाठी विजय मिळवणार,” असा विश्वास देखील माजी आमदार गोपालदास अगरवाल यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Gopaldas aggarwal left bjp and joined congress in the gondia assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 04:46 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • gondiya

संबंधित बातम्या

MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेवर काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी
1

MMRDA अभियांत्रिकी भरती परीक्षेवर काँग्रेसचा गंभीर आरोप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक
2

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना महत्त्वाची जबाबदारी, स्मृती इराणींचे कमबॅक

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती
3

Deepak Mhaskey News BJP IT Cell Chief: भाजप आयटी सेलमध्ये मोठा बदल; दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुखपदी नियुक्ती

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन
4

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.