Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

लातूर काँग्रेस भवन समोर होणाऱ्या भाजपाच्या नियोजित आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या आंदोलनापूर्वीच काँग्रेस भवन समोर पतीत पावन आंदोलन सुरू केले. तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी निषेध आंदोलन केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 01:52 PM
अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

अवमानाची लढाई आमने-सामने; लातुरात काँग्रेस विरुद्ध भाजप युवा मोर्चाचे जोरदार आंदोलन

Follow Us
Follow Us:

लातूर : लातूर काँग्रेस भवन समोर होणाऱ्या भाजपाच्या नियोजित आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या आंदोलनापूर्वीच काँग्रेस भवन समोर पतीत पावन आंदोलन सुरू केले. तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी निषेध आंदोलन केले. मात्र पोलिसांनी या दोन्हीही आमने-सामने होत असलेल्या आंदोलनाला गांधी चौकामध्ये पोलीस बंदोबस्ताचे कडे आणि दोरखंड लावून अडवणूक केली. यामुळे गांधी चौक ते काँग्रेस भवन पर्यंतचा मार्ग बंद राहिला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्हीही पक्षातील कार्यकर्त्यांची आंदोलने घोषणाबाजीने दुमदुमून गेले.

काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रगीताचा अवमान केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा च्या कार्यकत्यांनी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वा. काँग्रेस भवन समोर निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा अवलंबला. आणि भाजपाचे आंदोलन काँग्रेस भवन समोर होण्याअगोदरच त्यांचे कार्यकर्ते जमले.

आंदोलनावरून राजकीय संघर्ष

तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या नियोजित आंदोलनाला पोलिसांनी काँग्रेस भवन समोरची जागा नाकारून भारतीय जनता पक्षाच्या गांधी चौक येथील पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी दिली. मात्र याला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रमुख ऋषिकेश कराड यांनी कडाडून विरोध करत राष्ट्रगीताचा अवमान काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. यांना त्यांची आठवण करून देण्यासाठी आम्ही काँग्रेस भवन समोर आंदोलन करणार असा पवित्रा घेतला होता. मात्र या दरम्यानच्या काळामध्ये काँग्रेसचे आंदोलन काँग्रेस भवन समोर चालू असल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक भागामध्ये अडवून धरले. यावेळी भागामध्ये एक कार्यकर्ता पळत सुटला होता. मात्र यावेळी त्याला पोलिसांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

गांधी चौकात तणाव

दरम्यान काँग्रेसचे आंदोलन काँग्रेस भवन समोर चालू असल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गांधी चौक भागामध्ये अडवून धरले. त्यामुळे या भागामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी एक कार्यकर्ता निषेधाचे फलक घेऊन काँग्रेसच्या आंदोलनाकडे पोलिसांचे कडे तोडून पळत सुटला होता. मात्र यावेळी त्याला पोलिसांनी रोखल्यामुळे पुढील अनर्थ टळला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या या नियोजित आंदोलनाला काँग्रेसने भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पतित पावन आंदोलन केले.

हे सुद्धा वाचा : वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

काँग्रेस-भाजप आमनेसामने; घोषणाबाजीने वातावरण तापले 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या या नियोजित आंदोलनाला काँग्रेसने भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत पतित पावन आंदोलन केले. यामध्ये काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, नगरसेवक माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. किरण जाधव, महिला आघाडीच्या विद्या पाटील, महानगरपालिकेचे उपमहापौर स्नेहल उटगे, प्रवीण सूर्यवंशी, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या निषेध आंदोलनामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रमुख ऋषिकेश कराड, यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रगीत गायले. लातूरच्या इतिहासात प्रथमच या दोन्हीही आमने-सामने आंदोलनामुळे लातूर प्रथमच आंदोलनमय झाले होते.

Web Title: The bjp yuva morcha has staged a massive protest against the congress in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Latur

संबंधित बातम्या

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
1

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे ‘जेल भरो’ आंदोलन; शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
2

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश
3

काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
4

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.