Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gunratna Sadavarte : ‘राज ठाकरेंचं पितळ उघडं करणार’, 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunratna Sadavarte : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर मुंबईत संयुक्त जनमोर्चाची घोषणा केली आहे. यावर गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका करत मोर्चा यशस्वी होणार नसल्याचा दावा केला.

  • By विवेक
Updated On: Sep 26, 2026 | 09:53 PM
gunratna sadawarte on raj thackeray

gunratna sadawarte on raj thackeray

Follow Us
Follow Us:
  • राज-उद्धव ठाकरे 4 ऑक्टोबरला मुंबईत संयुक्त जनमोर्चा काढणार.
  • गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली.
  • सदावर्तेंनी सुप्रिया सुळे यांच्या शेतकरी आंदोलनावरही टीका केली.
 

Gunratna Sadavarte : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एकत्रितपणे 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. हा मोर्चा ‘SIR’च्या मुद्द्यावरून आयोजित करण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

या पार्श्वभूमीवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. 4 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी होणार नसल्याचा दावा करत सदावर्तेंनी राज ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांच्या प्रकरणावरही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. राज ठाकरेंचं ‘पितळ उघडं करणार’, असा इशाराही त्यांनी दिला.

‘4 ऑक्टोबरचा मोर्चा यशस्वी होणार नाही’

सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ओबीसी, कष्टकरी, वंचित आणि अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचा निषेध करावा, असे आवाहन त्यांनी केल्याचे वृत्त आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

राज ठाकरेंचे राजकारण म्हणजे ‘राजकीय दुकानदारी’ असल्याची टीकाही सदावर्तेंनी केली. मुंबई बंद किंवा रस्ते बंद केल्यास सामान्य नागरिकांना त्रास होऊ शकतो, असा मुद्दाही त्यांनी मांडला. आंदोलनाच्या इशाऱ्यांना आपण घाबरणार नसल्याचे सांगत राज ठाकरेंवर आणखी टीका करण्याचे संकेत त्यांनी दिले.

ज्ञानेश कुमारांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंच्या भूमिकेवर आक्षेप

ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरही सदावर्तेंनी आक्षेप घेतला. इंटर डिपार्टमेंटल कम्युनिकेशन आणि फाईल नोटिंग म्हणजे न्यायालयीन निर्णय नसल्याचे त्यांनी म्हटले. फाईल नोटिंगच्या आधारे कोणताही हक्क सिद्ध करता येत नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबरच्या मोर्चासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. मोर्चाची नेमकी वेळ आणि ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे राज ठाकरेंच्या घोषणेत सांगण्यात आले आहे.

सुप्रिया सुळेंच्या शेतकरी आंदोलनावरही निशाणा

सदावर्तेंनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या शेतकरी आंदोलनावरही टीका केली. शेतकऱ्यांच्या भावनांवर राजकारण करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. ‘गाड्या अडवा, जेलमध्ये जायला तयार’ या प्रकारच्या आंदोलनाच्या आवाहनावरही त्यांनी आक्षेप घेतला.

दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मदतीच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत दुष्काळाची मदत पोहोचावी, तसेच अन्नधान्य आणि रेशनची व्यवस्था करावी, अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन करत दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने आदेश काढण्याची मागणी केली.

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन

Web Title: Gunaratna sadavarte attack raj thackeray october 4 morcha gyanesh kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • election commission of india
  • Gunratna Sadavarte
  • raj thackeray
  • SIR

संबंधित बातम्या

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात
1

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले
2

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान
3

Amit Shah : हिम्मत असेल तर संसदेत येऊन चर्चा करा; अमित शाहांचे राहुल गांधींना थेट आव्हान

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?
4

Raj Thackeray: ‘पुढच्या वर्षी पुन्हा एकदा…’, राज ठाकरेंनी ट्विट करत केली मोठी घोषणा; यंदा दीपोत्सव रद्द, नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.