Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ठाणे कि रिक्षा’ म्हटल्यावर आग लागते मग जरांगेची भाषा मान्य आहे का?’ गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबईतील पत्रकार परिषदेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवर टीका करत एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनाही प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी अनेक गंभीर आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 03:54 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे यांच्या भाषेवर गुणरत्न सदावर्ते यांचा आक्षेप.
  • एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांना थेट सवाल.
  • गंभीर आरोपांसह कायदेशीर कारवाईचा इशारा
 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अलीकडील वक्तव्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख करत अनेक प्रश्न उपस्थित केले.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

सदावर्ते यांनी आरोप केला की, “मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी सातत्याने अवमानकारक भाषा वापरत आहेत. अशा प्रकारची भाषा स्वीकारार्ह आहे का,” असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून केला. एखाद्या व्यक्तीचा उल्लेख अपमानास्पद पद्धतीने केला जात असताना त्यावर संबंधित नेते मौन का बाळगतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, “मनोज जरांगे सातत्याने फडणवीस, बावनकुळे यांच्याविषयी अवमानकारक बोलत आहेत. हि गोष्ट एकनाथ शिंदेंना मेनी आहे का ? ठाणे कि रिक्षा हे गाणं ऐकल्यावर शिंदेंना आग लागते मग मनोज जरांगे चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतो, यावर एकनाथ शिंदे काहीच कसे बोलत नाहीत?”

‘प्रसाद लाड दिसले तर कानशिलात लगावणार’; लक्ष्मण हाके यांचा इशारा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

पत्रकार परिषदेत बोलताना सदावर्ते म्हणाले की, “भारतीय संविधान लागू झाल्यानंतर सर्व नागरिक समान आहेत आणि कोणालाही इतरांचा अपमान करण्याचा अधिकार नाही. कोणत्याही समाजाच्या किंवा नेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल, अशा प्रकारच्या वक्तव्यांना विरोध केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची भाषा वापरल्यास कायदेशीर मार्गाने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

जरांगेना कायदेशीर मार्गाने धडा शिकवणार

ते म्हणाले, ” या देशात संविधान अंमलात आल्यापासून कोणीही पाटील किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी शिलाक उरलेले नाही. त्यामुळे मनोज जरांगे इतर समाजाच्या नेत्यांबाबत अपमान करणारी, नीच भाषा वापरतात. तश्याप्रकारे आम्ही भटक्या, विमुक्त, ओबीसी, मागासवर्गीय, भिक्षुकी करणारे ब्राम्हण कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. जरांगेंनी तसं केलं तर कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असे ते म्हणाले.

‘शिवसेना कोणाची? उत्तर जनतेने दिलंय’; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरून एकनाथ शिंदेंचा टोला, अमित शहा यांच्या भेटीला मुंबईकडे रवाना?

यावेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोपही केले. जरांगे पाटलांचा संबंध रेती उपश्यांशी असल्याचे आरोप त्यांनी केले. तसेच, उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यात झालेल्या दूरध्वनीवरील संभाषणाचाही उल्लेख करत सदावर्ते यांनी त्या संवादातील भाषेवर आक्षेप नोंदवला. त्यांच्या मते, सार्वजनिक संवादामध्ये संयम आणि सभ्य भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले.

Web Title: Gunaratna sadavarte questions eknath shinde over manoj jarange remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Gunratna Sadavarte
  • Manoj Jarange Patil

संबंधित बातम्या

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन
1

PSI Death : ड्युटीवर आले अन् छातीत दुःखू लागलं, रुग्णालयात नेलं पण… एकनाथ शिंदेंच्या एस्कॉर्टमधील PSI चं निधन

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा
2

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
3

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
4

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.