कर्जत मध्ये राष्ट्रवादी महिला आघाडी आक्रमक रामदास कदम यांच्या प्रतिमेवर चपलांचा मारा
कर्जत, संतोष पेरणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झालेला दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कर्जत मध्ये शिवसेना नेते रामदास कदम यांचा निषेध मोर्चा काढून त्यांच्या प्रतिमेला चपलांनी हाणले.तर महिला कार्यकर्त्यांनी समोर दिसला तर तुझे तोंड काळे करून असा सज्जड दम देखील दिला. (NCP News)
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला खासदार सुनील तटकरे जबाबदार असून त्यांचा अपघात तटकरे यांनीच घडवून आणल्याची टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली होती. त्यानंतर खासदार तटकरे यांनी रामदास कदम यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करायला हवे असे विधान केले होते. मात्र रामदास कदम यांच्या विधानाचा राज्यभर समाचार घेतला जात असून कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कर्जत पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे,कर्जत नगरपरिषद अध्यक्ष पुष्पा दगडे, कर्जत महिला अध्यक्ष ॲड रंजना धुळे यांच्यासह आणखी महिला सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातून निघालेला मोर्चा श्रीराम पूल येथे थांबवून रामदास कदम यांचा निषेध करण्यात आला. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा आता कर्जतमध्ये जोरदार निषेध करण्यात आला.
रामदास कदम यांच्या या वक्तव्याविरोधात कर्जत-खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत कर्जतमधील श्रीराम पुलाजवळ निषेध आंदोलन केले.
अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या मागे घातपातामागे सुनील तटकरे यांचा हात आहे का, असा संशय कदम यांनी व्यक्त केला होता. याच वक्तव्याचे पडसाद थेट कर्जतमध्ये उमटलेत.कर्जत-खालापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. यावेळी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एवढंच नाही, तर रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत महिला कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.तर महिला पदाधिकारी रंजना धुळे यांनी तुम्ही समोर दिसला तर तोंड काळे करून सोडले जाईल असा सज्जड इशारा देखील दिला. रामदास कदम यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी वाढणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले! एकनाथ शिंदेंची खरमरीत टीका
Ans: शिवसेना नेते रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीने कर्जतमध्ये आंदोलन केले.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी या निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. यामध्ये नमिता घारे, पुष्पा दगडे आणि ॲड. रंजना धुळे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या.
Ans: आंदोलनादरम्यान ॲड. रंजना धुळे यांनी रामदास कदम समोर दिसल्यास त्यांचे तोंड काळे करण्याचा इशारा दिला.






