Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार; एकनाथ शिंदे प्रोड्युसर तर उदय सामंत डायरेक्टर’, गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात

Excerpt: मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली. जरांगे हे रिअॅलिटी शोमधील कलाकार असून या आंदोलनाला राजकीय झालर असल्याचा आरोप त्यांनी केला. गणेशोत्सवातील DJ बंदी आणि आंदोलनामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही सदावर्तेंनी भूमिका मांडली.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 08:23 PM
'जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार,' गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात

'जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार,' गुणरत्न सदावर्तेंचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • “जरांगे रिअॅलिटी शोमधले कलाकार; शिंदे प्रोड्युसर, सामंत डायरेक्टर”, सदावर्तेंची टीका.
  • शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यावर आक्षेप, बाल आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी.
  • गणेशोत्सवात DJ बंदीला विरोध, सर्वपक्षीय आणि सर्वसमावेशक समितीतून निर्णय घेण्याची मागणी.
 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला. “गणपती उत्सवात विघ्न म्हणजे मनोज जरांगे यांचे विघ्न”, असं म्हणत आपण या आंदोलनाला वैचारिक विरोध करत असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.

जरांगे हे रिअॅलिटी शोमधील कलाकार असून त्यांचे प्रोड्युसर एकनाथ शिंदे, तर उदय सामंत डायरेक्टर असल्याची उपमा सदावर्ते यांनी दिली. त्यांच्या आंदोलनाला राजकीय झालर असल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या उपोषणावरही उपरोधिक शब्दांत टीका केली.

शाळा बंद ठेवण्यावर सदावर्तेंचा आक्षेप

लातूर जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत सदावर्ते यांनी शिक्षणाच्या अधिकाराचा दाखला दिला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असेल, तर प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अंतरवाली सराटी परिसरातील विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यात अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला.

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असंविधानिक असल्याचा आरोप करत बाल आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सदावर्तेंनी केली. आंदोलनामुळे व्यापारी, कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.

“रस्ते रोखल्याने रुग्ण अडकतात”

आंदोलनादरम्यान रस्ते रोखले जात असल्याने रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना अडचणी येतात, पेट्रोल टँकरसह इतर वाहतुकीवर परिणाम होतो, असा दावा सदावर्ते यांनी केला. वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे सामान्य कुटुंबांचं नुकसान होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारने जरांगे यांच्याशी चर्चेसाठी उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव यांनाच पाठवावं, अशी मागणी त्यांनी केली. तसेच प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरूनही सदावर्तेंनी जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

गणेशोत्सवातील DJ बंदीवरही सदावर्तेंची भूमिका

दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळातील DJ बंदीच्या मुद्द्यावरही सदावर्तेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्त्यांवरील मारहाणीचं समर्थन करत नसल्याचं सांगतानाच, गणेशोत्सवाच्या काळातच DJ आणि डेसिबलचा मुद्दा का उपस्थित केला जातो, असा सवाल त्यांनी केला.

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

DJ बंदीचा निर्णय उत्सवाच्या काही दिवस आधी न घेता वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वपक्षीय आणि सर्व समाजातील प्रतिनिधींशी चर्चा करून घ्यावा, अशी सूचना सदावर्तेंनी केली. “आमच्या गणेशोत्सवात विघ्न नको”, अशी भूमिका मांडत कोणत्याही सणाच्या उत्सवात जाणूनबुजून अडथळा आणू नये, असंही त्यांनी म्हटलं.

पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर अनेक गंभीर आरोप केले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याबाबत अपमानास्पद भाषा वापरली जात असल्यास पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Web Title: Gunratna sadavarte manoj jarange eknath shinde uday samant reality show remark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • Gunratna Sadavarte
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष
1

Manoj Jarange Patil : ‘ओबीसींच्या नावावर सगळं खाल्लं’; मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर घणाघात, मराठा आरक्षण मुद्द्यावरून संघर्ष

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
2

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
3

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
4

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.