Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gunratna Sadawarte : ‘डंके की चोट पे सांगतोय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत’, गुणरत्न सदावर्तेंचं मोठं विधान

Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या राजकारणावर अनेक महत्त्वाची विधानं केली. एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत, असं डंके की चोट पे सांगत त्यांनी ठाकरे बंधू, देवेंद्र फडणवीस आणि ग्रंथालीच्या कार्यक्रमावरही भाष्य केलं.

  • By विवेक
Updated On: Oct 30, 2026 | 09:15 PM
gunratna sadavarte

gunratna sadavarte

Follow Us
Follow Us:
  • ठाकरे बंधू आणि फडणवीस एकाच मंचावर, सदावर्तेंनी केलं कौतुक
  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत, सदावर्तेंचं ठाम विधान
  • पूर्णेकर कुटुंबीयांच्या प्रकरणावर सदावर्तेंची प्रतिक्रिया
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या घडामोडींना वेग आला असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघे एकाच मंचावर आल्याच्या कार्यक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. मात्र, याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानाने राजकीय चर्चांना नवा विषय मिळाला आहे. (Gunratna Sadawarte)

काल झालेल्या ग्रंथालीच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाबाबत बोलताना सदावर्ते म्हणाले की, “ते ऑरगॅनिक राजकारणी वाटत होते. नॅचरल कार्यक्रम होता. ग्रंथालीला सॅल्यूट आहे. असा कार्यक्रम ठेवला. ३ नेते रोज फ्लॉवरसारखे दिसले. महाराष्ट्राने वेगळा आदर्श घेतला.”

महाराष्ट्राला मोठा सांस्कृतिक ठेवा असल्याचं सांगत त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं. तसेच, “काल ऑरगॅनिक पॉलिटिकल राजकारण दिसलं. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत; सदावर्तेंचं विधान

एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर भाष्य करताना सदावर्ते यांनी त्याला संकरित राजकारण म्हटलं. संजय शिरसाठ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी थेट भूमिका मांडली.

“डंके की चोट पे सांगतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत,” असं सदावर्ते म्हणाले. हा त्यांचा राजकीय दावा असून त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

पूर्णेकर कुटुंबीयांच्या प्रकरणावरही भाष्य

प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांच्या संदर्भात बोलताना सदावर्ते यांनी पोलिसांना तपासात हयगय न करण्याचं आवाहन केलं. त्यांनी यावेळी एका दाढीवाल्या व्यक्तीचा किंवा डीसीपी अधिकाऱ्याचा उल्लेख करत संशय व्यक्त केला. मात्र, या आरोपांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी त्यांनी दिलेली नाही.

संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांच्यावर टीका

संजय गायकवाड यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यावरही सदावर्ते यांनी नाराजी व्यक्त केली. “शेतकऱ्यांबद्दल असं बोलणं किती दलबद्री आहे. ही कोणती विचारधारा आहे,” असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, “आम्ही काही भाजपचे प्रवक्ते नाही आहोत,” असं स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिवाळीच्या निमित्ताने घरी बोलावलं तर त्यांनी यायला हवं, असंही सदावर्ते म्हणाले.

Sanjay Shirsat : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाटांच्या विधानाने मोठी खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले?

    Ans: "डंके की चोट पे सांगतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात मुख्यमंत्री होणार नाहीत," असं विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केलं.

  • Que: देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाबाबत सदावर्ते काय म्हणाले?

    Ans: ग्रंथालीच्या कार्यक्रमाचं कौतुक करत त्यांनी हा नैसर्गिक आणि राजकारणाच्या पलीकडे जाणारा कार्यक्रम असल्याचं म्हटलं.

  • Que: पूर्णेकर कुटुंबीयांच्या प्रकरणावर सदावर्ते यांनी काय मागणी केली?

    Ans: पूर्णेकर कुटुंबीयांसाठी पोलिसांनी तपासात कोणतीही हयगय करू नये, असं आवाहन गुणरत्न सदावर्ते यांनी केलं.

Web Title: Gunratna sadawarte eknath shinde cm statement uddhav raj thackeray vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Gunratna Sadavarte
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ
1

Nitesh Rane : एप्रिल-मे महिन्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील! नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Shirsat : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाटांच्या विधानाने मोठी खळबळ
2

Sanjay Shirsat : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाटांच्या विधानाने मोठी खळबळ

Nilesh Rane : ‘नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं !’ निलेश राणे यांच सडेतोड प्रत्युत्तर, भाजप शिंदे गटातील वाद कायम!
3

Nilesh Rane : ‘नवनाथ बन शिंदेसाहेबांवर बोलताना लायकीत राहायचं !’ निलेश राणे यांच सडेतोड प्रत्युत्तर, भाजप शिंदे गटातील वाद कायम!

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला
4

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.