
nitesh rane on aditya and uddhav thackeray
रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता नितेश राणे म्हणाले, “आमच्या वरिष्ठांनी नोंद घेतली असून, ते निर्णय घेणार आहेत, आम्ही त्याची वाट पाहू.” त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चेला आता वेगळंच वळण मिळालं आहे.
मात्र, याचवेळी राणे यांनी एप्रिल-मे महिन्याबाबत मोठा दावा केला. “एप्रिल, मे मध्ये उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे जेलमध्ये असतील,” असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.
संजय राऊत यांच्या विधानांवरही राणेंनी निशाणा साधला. “संजय राऊत यांची आतापर्यंत कुठली भाकित खरी ठरलेली नाहीत.” पुढे ते म्हणाले, “आमचं नरेंद्र मोदींचं सरकार अजून भक्कम होणार आहे. कारण, २०२९ ला मोठ्या मतांनी आणि मोठ्या ताकदीने निवडून येईल.”
तसेच, “कदाचित स्वतःच्या मालकाची तारीख एप्रिल महिन्यात ठरवली असेल,” असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे फोटोग्राफी करत राहिले असते तर खूप गोष्टी टाळल्या असत्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गालबोट लागून नसतं.”
याशिवाय राज ठाकरेंना कधीही नाराज केलं नसल्याचं सांगत, “२०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसंच मुख्यमंत्री राहतील. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान आहेत,” असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान, मुंबईत प्रशांत कुलकर्णी संपादित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले होते.
यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांना चांगले व्यंगचित्रकार, उद्धव ठाकरे यांना चांगले छायाचित्रकार आणि स्वतःला चांगला राजकारणी म्हणत मिश्किल टोला लगावला होता.
या कार्यक्रमानंतर ठाकरे बंधूंच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली असून, आता नितेश राणेंच्या विधानामुळे या चर्चेला आणखी रंग चढला आहे.
Ans: नितेश राणे यांनी एप्रिल-मे महिन्यात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जेलमध्ये असतील, असा दावा केला आहे.
Ans: रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमच्या वरिष्ठांनी नोंद घेतली असून, ते निर्णय घेणार आहेत, आम्ही त्याची वाट पाहू, असं नितेश राणे म्हणाले.
Ans: २०२९ पर्यंत देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असं मत नितेश राणे यांनी व्यक्त केलं.