
हरदीपसिंग पुरी केंद्रीय मंत्रिपदी कायम राहणार; राज्यसभेवर जाण्याचा मार्ग अखेर मोकळा
पुरी केंद्रीय मंत्रिपदी कायम राहणार
मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. हरदीप पुरी हे २०२१ पासून मोदी सरकारमध्ये पेट्रोलियममंत्री आहेत. अलीकडेच भाजपने उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात पुरी यांचे नाव नसल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तसेच मोदी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे पुरी हे केंद्रीय मंत्रिमंडळात नसतील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, आता त्यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि तामिळनाडूतून येणारे भाजप नेते एल. मुरुगन यांनी नुकताच राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आहे. आता राज्याच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे त्यांनी राजीनाम्यात म्हटले. यानंतर, मध्य प्रदेशातील राज्यसभेची जागा रिक्त झाली. भाजपने येथून पुरी यांना संधी दिली आहे.
तेलसंकटाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
इराण-अमेरिका तणावामुळे तेल बाजारात अनिश्चितता निर्माण झाली असताना पुरी यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल खरेदीसंदर्भात भारतानेही विविध राजनैतिक पावले उचलली आहेत.
FAQ
प्रश्न 1: हरदीपसिंग पुरी यांना कोणत्या पक्षाने उमेदवारी दिली?
उत्तर: भारतीय जनता पक्षाने (भाजप) त्यांना मध्य प्रदेशातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली.
प्रश्न 2: हरदीपसिंग पुरी सध्या कोणत्या पदावर आहेत?
उत्तर: ते केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत.
प्रश्न 3: त्यांचा सध्याचा राज्यसभा कार्यकाळ कधी संपणार आहे?
उत्तर: उत्तर प्रदेशातून राज्यसभा सदस्य म्हणून असलेला त्यांचा विद्यमान कार्यकाळ २५ नोव्हेंबर २०२६ रोजी संपणार आहे.