Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा की आणखी एक जुमला? हर्षवर्धन सकपाळ यांचे मोठे वक्तव्य

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी "भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला?" असा सवाल उपस्थित केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 02, 2026 | 08:46 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असून राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यावरूनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी “भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला?” असा सवाल उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅबिनेट मिटिंग घेण्यात आली. त्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाईल. मात्र राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकांमुळे लागलेल्या आचारसहिंतेमुळे या निर्णयाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. या निर्णयानंतर दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेवर आज कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबत हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शेतकरी कर्जमाफी मंजूर तरीही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, “केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर…”

हर्षवर्धन सकपाळांचे ट्विट व्हायरल

आपल्या ट्विटमधून ते म्हणाले, “भाजप महायुती सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे की आणखी एक निवडणूकपूर्व जुमला, याचा निर्णय प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच होईल! लाडकी बहीण योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला, पण आज जवळपास ८० लाख महिलांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे आता ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याच्या दाव्याकडेही शेतकरी संशयाने पाहत आहेत. या सरकारची पद्धतच घोषणा मोठी आणि लाभार्थी कमी अशी राहिली आहे. विविध अटी-शर्ती लावून लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे.”

पुढे ते म्हणाले, “आज कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी कांद्याला एक रुपया किलो दरही मिळत नाही. शेतकऱ्यांचे कर्ज वाढत आहे, संसार मोडत आहेत आणि सरकार मात्र केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहे. जर सरकारला खरोखरच शेतकऱ्यांचे भले करायचे असेल तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करावा. कांद्याला किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि शेतमालाला कायदेशीर हमीभावाची हमी द्यावी. शेतकऱ्यांना प्रसिद्धीची नाही, तर न्यायाची गरज आहे. कर्जमाफीच्या घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारे निर्णय घ्या!”

“२४ हजार कोटींचा फटका!” ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Web Title: Harshvardhan sakpal statement over maharashtra government approves farmers loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
1

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
2

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
3

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
4

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.