Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 05:29 PM
वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे. वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला एमएसईबी च्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबील माफीच्या केलेल्या घोषणेवरुन सपकाळ यांनी टीका केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा सरकार सर्वच क्षेत्राचे खाजगीकरण करत आहे. आता शिक्षण क्षेत्राचेही खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा डाव आहे म्हणूनच राज्यातील शासकीय शाळा बंद पाडल्या जात आहेत. ज्या शासकीय शाळा अजून आहेत, त्यांना कसल्याच सुविधा नाहीत, वीज नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाहीत, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. सरकारला या शाळा सुरु ठेवायच्या नाहीत. शासकीय शाळा बंद पाडून खाजगी कंपन्यांच्या हाती शिक्षण क्षेत्र देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हा घाट घातला जात आहे. राज्याला शिक्षण मंत्री आहेत का, हेच समजत नाही. दादा भुसे यांनी कठोर निर्णय घेऊन शासकीय शाळा वाचवल्या पाहिजेत, पण ते फक्त भ्रष्टाचार करत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक देशविरोधी

मतदार पुनर्रचना विधयेक हे देशाच्या एकतेला धोका पोहचवणारे आहे. या विधेयकामागील भाजपाचा हेतू देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे करण्याचा आहे म्हणूनच संसदेच्या मागील अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा हे विधेयक मंजूर करण्याचा आटापिटा भाजपाने सुरु केला आहे, त्यासाठीच तृणमूल काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एकदा फोडण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने या विधेयकावरील आपली भुमिका आधीच स्पष्ट केली असून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चिरफाड संसदेत केलेली आहे. भाजपाला वन नेशन वन पॉलिटीकल पार्टी व्यवस्था देशात आणायची आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव

सोनम वांगचुक यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी ज्या मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे, त्याच मागण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरु केलेले आहे. नीट पेपर लिकचा मुद्दा काँग्रेस पक्षाने लावून धरला असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी एल्गार पुकारला आहे. राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज अभियान सुरु केलेले आहे. राजस्थानच्या कोटा शहरातून सुरु केलेल्या अभियनाचा १७ तारखेला डेहराडून येथे कार्यक्रम होत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Harshvardhan sapkal has criticized the government over the electricity bill waiver issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:29 PM

Topics:  

  • Adani Group
  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल
1

भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
3

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
4

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.