Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्कासित करावे, असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 14, 2026 | 04:47 PM
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचे RSSला आव्हान, म्हणाले; हिम्मत असेल तर...

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिरातील देणगीवर दरोडा टाकून भाजपा व राष्ट्रीय संवयंसेवक संघाने कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. दरोड्यावर आता आरएसएसमधून नाराजी व्यक्त केली जात आहे पण नाराजी व्यक्त करून काही फायदा नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हिम्मत असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभूरामाच्या नावावर अब्जावधी रुपयांचा दरोडा टाकणाऱ्या संघाशी संबंधित सर्वांना संघातून निष्कासित करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागाची जिल्हानिहाय आढावा बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राम मंदिराचा वापर भाजपा व रा. स्व. संघाने स्वतःच्या फायद्यासाठी केला. मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचा मोठा इव्हेंट करून सर्व श्रेय आपल्याच पदरात कसे पडेल यासाठी आटापिटा केला पण त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. श्रीरामाला भक्तिभावाने दान दिलेल्या पैशांवरच या लोकांनी दरोडा टाकला. या दरोड्याला सर्व विश्वस्त मंडळच जबाबदार आहे. मंदिरातील आर्थिक व्यवहाराचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी कोषाध्यक्ष यांचीच आहे पण दरोड्याशी माझा संबंध नाही, असे जर ते म्हणत असतील तर ते हास्यास्पद आहे. विश्वस्त मंडळाची आताची भूमिका ‘तो मी नव्हेच’ अशी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीए बरोबर जाण्याच्या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अशा पद्धतीच्या चर्चा मागील काही दिवसापासून सुरु आहेत परंतु या पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी याचे खंडन केले असून त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच सत्ताधारी पक्षात सत्तेचा समतोल बिघडलेला आहे, सर्व काही आलबेल आहे असे नाही असेही सपकाळ म्हणाले.

पेपरफुटीविरोधात काँग्रेस आक्रमक

उद्धव ठाकरेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्षाने लोकशाही, संविधान रक्षण, नीट पेपर फुटी, टीईटी पेपर फुटी, एमपीएससीतील गैरकारभाराविरोधात आवाज उठललेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही नीट पेपर फुटीविरोधात ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम देशभर सुरु केलेला आहे. काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : ‘लाडकी बहिण’ योजनेवर सत्तेतील सावत्र भावांचा दरोडा, तब्बल 3500 कोटी…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

बोगस सरकारचा बोगस कारभार

राज्यात दुबार पेरणीचे संकट आले असून राज्य सरकारने दुष्काळाचा सामना करण्यासाठी काहीही तयारी व नियोजन केलेले नाही. एल निनोमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यास सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याचे संकट मोठे आहे. बोगस बियाणांप्रमाणे सरकारही बोगस असून त्यांचा कारभारही बोगस आहे, असेही सपकाळ म्हणाले. शेतकरी कर्जमाफीस जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. आयकर विभागाकडून यादी मागवण्यात आली आहे, ही यादीही उशिरा द्या असे एका मंत्र्यांनी सांगितले असून कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

Web Title: Congress state president harshvardhan sapkal has challenged the rss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • congrss
  • Harshvardhan Sapkal
  • RSS

संबंधित बातम्या

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी
1

Droght News : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! वाशिममधून हर्षवर्धन सपकाळांची मोठी मागणी

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी
2

Drought News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या! काँग्रेसची मोठी मागणी

भाजपचा पैसा फेक, तमाशा देख’चा अहंकार उतरवा; हर्षवर्धन सपकाळ यांचे शिक्षक-पदवीधरांना आवाहन
3

भाजपचा पैसा फेक, तमाशा देख’चा अहंकार उतरवा; हर्षवर्धन सपकाळ यांचे शिक्षक-पदवीधरांना आवाहन

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा
4

ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही; सपकाळांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.