Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांधी भवनातील गोंधळावर हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; ‘काँग्रेस कार्यालयावर हल्ल्यामागे भाजप व पोलिसांची फूस’

गांधी भवनातील काँग्रेस कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी कथितरित्या धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व पोलिसांवर गंभीर आरोप केले. तसेच काँग्रेस गांधीवादी मार्ग सोडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 04, 2026 | 09:16 PM
Harshvardhan Sapkal

Harshvardhan Sapkal

Follow Us
Follow Us:
  • गांधी भवनातील घटनेवर हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजप व पोलिसांवर गंभीर आरोप
  • काँग्रेस कार्यालयाला पोलीस संरक्षण नसल्याचा मुद्दा उपस्थित
  • काँग्रेस गांधीवादी मार्गावर ठाम असल्याचे सपकाळ यांचे स्पष्ट विधान
 

मुंबई, दि. ४ ऑगस्ट: गांधी भवनातील काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी कथितरित्या घुसून गोंधळ घातल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणामागे भारतीय जनता पक्ष आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे लोकशाही आणि राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याचेही त्यांनी म्हटले.

यावेळी माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काँग्रेसचे कार्यालय गांधी भवनमध्ये घुसून धुडगुस घातला. यामागे भारतीय जनता पक्ष व पोलिसांची फूस होती. एखाद्या पक्षाच्या कार्यालयात घुसून अशा पद्धतीने भ्याड हल्ला करण्याचा हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. आरे ला कारे म्हणता येते पण काँग्रेस पक्ष गांधींचा मार्ग सोडणार नाही. सांगून आले असते तर संविधान देऊन त्यांचे स्वागत केले असते.”

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

गांधी भवन मध्ये घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हिंसा करण्याचा प्रयत्न केला, या भ्याड हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात आले होते पण त्याची भनक पोलिसांना लागली नाही यावर विश्वास बसत नाही, पोलिसांची भूमिका ही सदरक्षणाय, खलनिग्रहणाय नसून खलरक्षणाय अशी होती. काँग्रेस कार्यालय गांधी भवनला पोलीस सुरक्षा नव्हती, पोलिसांच्या नाकर्तेपणाचाही काँग्रेस पक्ष निषेध करतो.”

Devendra Fadnavis: ‘काँग्रेस अत्यंत खालच्या स्तरावर..’; सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

“आमच्यावर कितीही हल्ले केले तरी आम्ही विरोधी पक्षाची भूमिका सोडणार नाही, सभ्यता व संस्कृती सोडणार नाही. पण असेच सुरु राहिले तर कोणीही कोणाच्या घरात घुसेल. आम्हालाही त्यांना प्रतिक्रिया देता येते पण आम्ही आमचा मार्ग व संस्कृती सोडणार नाही. त्यांना काँग्रेस कार्यालयात हिंसाचार करायचा होता, ज्या व्यक्तीने हा धूडगुस घातला, त्याची अजित पवार यांनी पदावरून हकालपट्टी केली होती,” असे सपकाळ म्हणाले.

सुनेत्रा पवार आणि ऐतिहासिक उदाहरणांचा उल्लेख

“काँग्रेस नेते व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मौनी बाबा म्हटले होते तर इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया म्हटले होते पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान दिलेले आहे, त्यांनी आपल्या कार्यातून उत्तर दिले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कार्यातून उत्तर द्यावे. आता काहीजण काँग्रेस पक्षाला उपदेशाचे डोस पाजत आहेत, सभ्यता व संस्कृती शिकवत आहेत. काँग्रेसने सभ्यता व संस्कृती पाळूनच सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसचा उमेदवार मागे घेतला होता, त्यामुळे आम्हाला सभ्यता शिकवू नका,” असेही सपकाळ म्हणाले.

‘गुंगी गुडिया’ वादावर एकनाथ शिंदे संतापले; काँग्रेसने सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी

Web Title: Harshvardhan sapkal on gandhi bhavan attack congress office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:16 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
1

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
2

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
3

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.