Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत सपकाळांनी फडणवीसांवर टीका केली.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 05:17 PM
Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis

Harshvardhan Sapkal Criticized CM Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल
  • ‘जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’, सपकाळांची बोचरी टीका
  • आरक्षणासह बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावरही फडणवीसांना घेरलं
 

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेत नाही. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील पोस्टमधून सपकाळांनी फडणवीसांवर थेट आणि बोचऱ्या शब्दांत टीका केली.

फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना सपकाळांनी ‘फसवणीस’ या शब्दाचा वापर केला. वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाल्याचा आरोप त्यांनी केला.

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

‘महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही’

आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्राची सुजाण जनता दुधखुळी नाही.” महाराष्ट्रात खोटे फॅक्ट्स पेरण्यात आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात फडणवीस आणि दिल्लीतील भाजप नेतृत्वाचा हात कोणीच धरू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राची सुजाण जनता दुधखुळी नाही! महाराष्ट्रात खोटे फॅक्ट्स पेरण्यात आणि जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यात तुमचा आणि तुमच्या दिल्लीतील ‘राजा बाबू’चा हात कोणीच धरू शकत नाही. लहान मुलाला विचारलं तरी खोटेपणाच्या शर्यतीत पहिलं नाव तुमचंच येईल..!… pic.twitter.com/UuwdZwAFsC — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) September 4, 2026

वेगळा विदर्भ, धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण यांसारख्या मुद्द्यांचा दाखला देत सपकाळांनी फडणवीसांवर आरोप केले. “असंख्य मुद्द्यांवर तुमचा खोटारडेपणा उघडा पडला आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला ‘फसवणीस’ नाव दिले आहे,” असं सपकाळांनी म्हटलं.

राहुल गांधींच्या मुद्द्यांचा दाखला

याच पोस्टमध्ये सपकाळांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचाही उल्लेख केला. नोटबंदी, कोविड काळातील परिस्थिती, अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि महागाई या विषयांवर राहुल गांधी यांनी केलेले दावे आणि उपस्थित केलेले प्रश्न आज वास्तव म्हणून देशासमोर उभे असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे इतरांवर ‘फेक नरेटिव्ह’ पसरवल्याचा आरोप करण्याचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचा टोला सपकाळांनी फडणवीसांना लगावला.

Uddhav Thackeray : मतदारयादीवरून महाराष्ट्रात रणकंदन; बीडचे 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भाजपवर गंभीर आरोप

दरम्यान, सपकाळांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. आगामी काळात भाजपकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Harshwardhan sapkal criticism devendra fadnavis fasvanis maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Politcs

संबंधित बातम्या

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
1

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
2

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक
3

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
4

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.