Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut on National Politics And RSS: “राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींना मंत्रिमंडळात बदल करता येत नाही. कारण त्यांच्या पक्षात बंडाळ्या सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामे देण्यास नकार दिला आहे. आधी गृहमंहमंत्री अमित शांहाचा राजीनामा घ्या, मग आम्ही राजीनामा देतो, त्यामुळेच मोदी मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये आणि तो होऊ शकत नाही. आता भाजपचा खेळ संपला आहे. मोदींच्या पतनाची ही सुरुवात आहे.” असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सतत सप्टेंबरमध्ये मोठं काही घडणार असल्याचा दावा करत आहात, मग सप्टेंबरमध्ये असं काय घडणार आहे, असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट भाजपच्या अंतर्गत बंडाळीवर बोट ठेवून पक्षातील मोदी आणि शाह यांचा वर्चस्व संपुष्टात आलं आहे.मी 17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. गेल्या १० वर्षांत पहिल्यांदाच बंडाळीचं स्वरुप वाढलं आहे. पक्षात मोदी आणि शाह यांची जी दहशत होती, ती आता राहिली नाहीये. जुने मोदी असते तर मोडून तोडून बरखास्त केले असते. पण ज्या चार प्रमुख मंत्र्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे, ते सर्वजण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे, असं राऊत म्हणाले.
“राष्ट्रीय स्वयंसेवर संघाने केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान पद निर्माण करण्याची आणि एक तरुण तडफदार आरएसएसला मानणारा एक उपपंतप्रधान नियुक्त करा जो तुमचा पुढचा पंतप्रधान असेल, असी भूमिका घेतलीआहे. पंतप्रधान पदासाठी आता आरएसएसला अमित शाहा पण नको आहेत. त्यामुळे आता अमित शाहांचाही खेळ संपला आहे. मी कोणाचेही नावं घेतलेलं नाही. या सर्व घडामोडी बरंच काही सांगून जातात, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलं आहे.
देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, ” देवेंद्र फडणवीस दर ७२ तासांनी दिल्लीला का जावे लागतयं हे आश्चर्य आहे. महाराष्ट्र इतकं मोठं राज्य आहे. मग उठसूट दिल्लीत जाऊन काय चर्चा करत आहात. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जावेत आणि सर्वोच्च पदी जावेत ही फक्त एकनाथ शिंदेंची नव्हे तर भाजपमधील अनेकांची इछ्चा आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना सतत दिल्लीत जावे लागते कारण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे अमित शाहा आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख मातोश्रीवर आहेत त्यामुळे आम्हाला मातोश्रीवर जावं लागत नाही. शिवसेना ही मातोश्रीतून आणि शिवसेनाभवनातून काम करेल. पण त्यांच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत असल्याने त्यांचे आदेश घेण्यासाठी त्यांना दिल्लीत जावं, लागतं.






