Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रमुख रणनीतीकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात एक महत्त्वपूर्ण राजकीय उपक्रम राबवला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे बिहारमधील बऱ्याच बंडखोरांच्या तलवारी म्यान झाल्याची चर्चा आहे. अमित शाहा यांनी त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या बंडखोर नेत्यांशी सलग चर्चा केली आणि त्यांना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी तयार झाले आहेत.
शहा यांच्या या प्रयत्नामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद मोठ्या प्रमाणात निवळल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणुकीत एकसंघ लढाई लढण्यासाठी हा उपक्रम भाजपसाठी निर्णायक ठरेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) तिकीट नाकारल्यानंतर, अनेक पक्षाचे कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी बंडखोरी करत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षातून किंवा अपक्ष म्हणून राज्यभरातील विविध विधानसभा जागांसाठी अर्ज दाखल करत दंड थोपटले होते.
बिहार दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बंडखोरांना शांत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. अमित शाह यांनी बिहारची राजधानी पाटण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत बंडखोरांशी बैठका घेतल्या आणि त्यांची समजूत काढली. अमित शाहांची ही खेळी यशस्वी ठरली. भाजपने बंडखोर उमेदवारांशी वाटाघाटी करण्यासाठी त्यांच्या अनेक प्रमुख नेत्यांना तैनात केले आहे. अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील चर्चेनंतर, बिहार विधानसभेच्या जवळपास अर्धा डझन जागांवरून बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले.
BLA Attack on Paksitan: तालिबानशी सामंजस्य करारानंतर BLA चा पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर हल्ला
दरम्यान, मुंगेरच्या तारापूर विधानसभा मतदारसंघातील विकासशील इंसान पक्षाचे (व्हीआयपी) उमेदवार सकलदेव बिंद यांनी सोमवारी (२० ऑक्टोबर २०२५) बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार सम्राट चौधरी यांना पाठिंबा दिला. बिंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सम्राट चौधरी यांना पाठिंबा जाहीर केला. हे उल्लेखनीय आहे की भारतीय जनता पक्षाने मुंगेरच्या तारापूर विधानसभा मतदारसंघातून बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी गोपालगंज सदर मतदारसंघात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा निवळली आहे. भाजपच्या विद्यमान आमदार कुसुम देवी यांचे पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी उघडपणे बंडाचे झेंडे उभारले होते. त्यांच्या नाराजीतूनच त्यांच्या मुलगा अनिकेत कुमार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. या निर्णयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठा फटका बसू शकला असता, कारण पक्षाच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
त्याचवेळी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या हस्तक्षेपानंतर संपूर्ण समीकरण पालटले. बिहार दौऱ्यादरम्यान शहा यांनी पाटण्यामध्ये कुसुम देवी यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी आपला बंडाचा पवित्रा सोडला आणि एनडीए उमेदवाराला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या मुलगा अनिकेत कुमार यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.