तालिबानशी सामंजस्य करारानंतर BLA चा पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर हल्ला; सात सैनिक ठार
Bihar मध्ये उडणार राजकीय धुरळा; आरजेडीने अवलंबवले तर M-Y समीकरण; तर NDA ने थेट सवर्णांनाच…
एकीकडे अफगाण सीमावरील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने तालिबानसोबत युद्धबंदीचा करार केला. पण त्याचवेळी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला करत ७ सैनिकांना ठार केले. मिळालेल्या माहितीनुसार, बीएलएने केवळ पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्लाच केला नाही तर सैनिकांनाही ठार मारले. पाकिस्तानच्या लष्करी वाहनावर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले. बलुचिस्तान प्रांतात वाढत्या चकमकींमुळे पाकिस्तानच्या सुरक्षादलांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अलीकडेच पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तानातील तालिबानसोबत सीमा भागात शांतता राखण्यासाठी करार केला होता. मात्र, बलुचिस्तानमधील हल्ल्यामुळे या कराराचा परिणाम कितपत होईल, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बलुचिस्तानच्या मांड भागात माहिर आणि रुदिग दरम्यान हा हल्ला झाला, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केलेल्या या हल्ल्यात पाकिस्तानचे सात सैनिक ठार झाले तर दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने बलुचिस्तान बंडखोरांच्या वर्चस्व असलेल्या भागात हा हल्ला केला. याआधी, टीटीपीने पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर स्फोटकांनी भरलेल्या कारने हल्ला केला होता, या हल्ल्यातही पाकिस्तानचे जवळपास २० सैनिक मारले गेले होते.
OnePlus 15 5G Vs Samsung Galaxy S25: कोणता फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे अधिक दमदार? बेस्ट किंमतीत
यापूर्वीही बलुचिस्तानने पाकिस्तानमध्ये असेच हल्ले केले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला, बलुचिस्तानमधील मास्तुंग येथील दश्त भागात रेल्वे ट्रॅकवर झालेल्या हल्ल्यात जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला. या हलल्यात एक्सप्रेसचा एक डबा उद्ध्वस्त झाला आणि सहा डबे रुळावरून घसरले. १० ऑगस्ट रोजी मास्तुंग जिल्ह्यातही आयईडी स्फोट कऱण्यात आला होता. याही हल्ल्यात याच ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले आणि चार जण जखमी झाले. ४ ऑगस्ट रोजी कोलपूरजवळ झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही बीएलएने स्वीकारली. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांविरुद्ध आणि स्वातंत्र्यासाठी लढा उभारला आहे. पण याला पाकिस्तानी सरकारकडून दहशतवाद म्हटले जात आहे.






