
‘टोरंट प्रकल्प आम्हाला नको, राज्यात कुठेही न्या’; आरपीआय आठवले गटाचा विरोध
रायगड जिल्हा आरपीआय आठवले पक्षाने कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी मधील सायडोंगर येथे सुरू असलेल्या जंगलतोड यांची पाहणी केली. त्यावेळी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद गायकवाड, कोकण प्रदेश संघटक राहुल डाळिंबकर, कोकणचे नेते मारुती गायकवाड,तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिसरात जाऊन आंदोलन केले.यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पर्यावरणाचे नुकसान करून प्रकल्प उभारला जात तर आमचा विरोधच राहील.
जंगल उध्वस्त करून आम्हाला प्रकल्प नको आहे, जंगल तोडल्याने आपोआप पाऊस कमी पडणार हे सत्य स्वीकारले तर यावर्षी पाऊस नाही आणि त्याचे कारण सरकार जंगले नष्ट करीत आहेत. त्यामुळे सरकारने आधी जंगल राखण्याचे काम केले पाहिजे आणि जेथे ओसाड भाग आहे तेथे प्रकल्प उभारले पाहिजेत.
90 हजार आधी लावा आणि नंतर ही झाडे तोडायला या असे आमच्या पक्षाचे म्हणणे असून सरकारने जंगलावर अवलंबून असलेल्या लोकांना उध्वस्त करू नका अशी सरकारला विनंती आहे. राष्ट्रवादी पाठोपाठ आता आरपीआय आठवले पक्षाने विरोध दर्शवला आहे.त्यामुळे सरकारची गोची झाली असून हा प्रकल्प लादणार काय? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
टोरंट प्रकल्प म्हणजे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीकडून उभारण्यात येणारा 3,000 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्प (Pumped Storage Hydropower Project) आहे. या प्रकल्पाचे नाव सैदोनगर-I (Saidongar-I) पंप्ड स्टोरेज प्रकल्प असे आहे. हा प्रकल्प सुमारे 13,500 कोटी रुपये खर्चाचा असून, त्यावरून सध्या पर्यावरण आणि वृक्षतोडीचा मोठा वाद सुरू आहे.
1. एका उंच ठिकाणी वरचा जलाशय तयार केला जातो.
2. दुसऱ्या कमी उंचीच्या ठिकाणी खालचा जलाशय असतो.
3. वीज अतिरिक्त उपलब्ध असताना पंपांच्या मदतीने पाणी वरच्या जलाशयात चढवले जाते.
4. विजेची मागणी वाढल्यावर वरचे पाणी खाली सोडले जाते.
5. पाण्याच्या प्रवाहामुळे टर्बाइन फिरतात आणि वीज निर्माण होते.
म्हणजेच हा प्रकल्प वीज निर्माण करण्याबरोबरच अतिरिक्त विजेची ऊर्जा साठवून ठेवण्याचे काम करतो.
Ans: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी टोरंट प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
Ans: आधी ९० हजार झाडे लावा आणि त्यानंतरच टोरंट प्रकल्प घेऊन इकडे या, अशी मागणी नरेंद्र गायकवाड यांनी केली आहे.
Ans: टोरंट प्रकल्प आम्हाला नको असून तो महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही घेऊन जा, अशी भूमिका आरपीआय आठवले गटाने मांडली आहे.