Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar Politics:नंदुरबारमध्ये राजकारण तापलं; भाजप आमदाराने शिंदेंच्या आमदाराच्या मुलालाच कार्यक्रमातून हाकललं

हाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटप कार्यक्रमात दोघांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला.या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

  • By anuradha sagar
Updated On: May 28, 2025 | 10:28 AM
Nandurbar Politics:नंदुरबारमध्ये राजकारण तापलं; भाजप आमदाराने शिंदेंच्या आमदाराच्या मुलालाच कार्यक्रमातून हाकललं
Follow Us
Follow Us:

Nandurbar Politics: स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सध्या सुरू असलेल्या भांडी वाटप कार्यक्रमावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात श्रेयवादाचे राजकारण चांगलेच तापले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे माजी मंत्री आणि नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार होते. मात्र त्याआधीच शिवसेना (शिंदे गट)चे विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र राम रघुवंशी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कार्यक्रमस्थळी जाऊन गोंधळ घातला. लोकांना दिवसभर उन्हात बसवून ठेवले जात आहे, असा आरोप करत त्यांनी आक्षेप नोंदवला आणि वातावरणात तणाव निर्माण झाला.

नागपूर हिंसाचारप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला; फहीम खानवर देशद्रोहाचा ठपका कायम

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आणि भाजपचे नंदुरबारचे आमदार डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेना (शिंदे गट)चे संपर्कप्रमुख व विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील राजकीय वाद नवीन नाही. मात्र, सध्या हे वाद अधिक तीव्र होत चालले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या भांडे वाटप कार्यक्रमात दोघांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला.या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याचदरम्यान, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे सुपुत्र आणि शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी कार्यक्रमस्थळी येत नंदुरबार तालुक्यातील काही लाभार्थ्यांना भांडे पेट्यांचे वाटप होत नसल्याची तक्रार आपल्या वडिलांकडे केली.

त्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सकाळपासूनच वितरण सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी स्वतः वितरण स्थळी पोहोचले आणि परिस्थितीची पाहणी केली.त्यांनी उपस्थित ठेकेदाराला विचारणा केली की, “इतक्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थी उपस्थित असूनही, त्यांना पेट्या का देण्यात येत नाहीत?” यावर ठेकेदाराने उत्तर दिले की, “जोपर्यंत लोकप्रतिनिधी कार्यक्रम स्थळी येऊन संच वाटप करत नाहीत, तोपर्यंत वितरण करता येणार नाही.” हा प्रकार उघडपणे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. त्याचबरोबर भाजप आणि शिंदे गटातील समन्वय अभावी लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे चित्रही यानिमित्ताने समोर आले आहे.

Asian Athletics : स्पर्धेत भारताची पहिल्या सुवर्ण पदकाला गवसणी; Gulveer Singh ने केली सोनेरी कामगिरी…

भांडे वाटपाच्या कार्यक्रमस्थळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची एन्ट्री होताच वादास सुरुवात झाली. शिवसेना जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या समोरच डॉ. गावित यांनी आरोप केला की, “येथे काही लोक तुम्हाला भडकावण्यासाठी आले आहेत. त्यांनी आदिवासींच्या घरकुलांना बंद पाडले, विहीर योजना ठप्प केली आहे.”

डॉ. गावित यांनी सांगितले की, या योजना बंद पाडण्यामागे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांचे सुपुत्र यांचा हात आहे. कार्यक्रमस्थळी दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक वाद विकोपाला गेला. डॉ. विजयकुमार गावित यांनी राम रघुवंशी यांना थेट “गेट आऊट” म्हणत, “हा आमचा कार्यक्रम आहे, मी आमदार आहे. तुम्ही येथे काम करू शकत नाही, त्यामुळे इथून निघून जा” असे सांगितले. या वादात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उत्तर दिले की, “कोण कोणत्या गोष्टीचा लाभार्थी आहे हे मी पुढे सांगणार आहे.” तसेच, चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ. गावित यांच्यावर आदिवासी जमिनी हडप करण्याचा गंभीर आरोपही केला.

Web Title: In nandurbar bjp mla threw out shindes mlas son from the event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • BJP
  • shivsena

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा
3

Mumbai News : सातरस्ता BIT चाळ पुनर्विकासात नेमकं काय घडलं? 324 कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर, शिवसेनेने पालिकेत मांडला मुद्दा

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
4

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.