नागपूर शहराच्या महाल परिसरात 17 मार्च 2025 रोजी दोन गटांमध्ये तुफान राडा आणि दगडफेक झाली होती. या दंगलीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याचा जमीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
नेमकं काय प्रकरण?
१७ मार्च रोजी महाल परिसरात दोन समाजांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद लवकरच नियंत्रणाबाहेर गेला आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि आगजनी झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. १८ मार्च रोजी पोलिसांनी तात्काळ कारवाईकारात मुख्य सूत्रधार आरोपीला अटक केली.
फहीम खानवर गंभीर आरोप
फहीम खान असे अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचा नाव आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता अंतर्गत देशद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे, दंगल घडवून आणणे, सार्वजनिक शांततेला धोका पोहोचवणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फहीम खानवर आरोप आहे की, त्याने सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट्स करून युवकांना चिथावून दंगल घडवून आणली. पोलिस तपासानुसार, दंगल घडवण्यात त्याची सक्रिय भूमिका होती.
सध्या काय स्थिती आहे?
फहीम खान सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून आणखी काही आरोपींच्या अटकेची शक्यता आहे. या दंगलप्रकरणाचा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मोठा प्रभाव पडला असून, नागपूर पोलिसांनी या प्रकरणात कडक भूमिका घेतली आहे.
महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्याला ठोेकल्या बेड्या; ‘या’ भागातून सापळा रचून पकडले