Indian Gen Z Support Rahul Gandhi Or PM Narendra Modi political news
Indian Gen Z : नवी दिल्ली : आपल्या शेजारील नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे मोठे रान पेटले. नेपाळमध्ये Gen-Z च्या आंदोलनामध्ये मोठा विध्वंस झाला. अवघ्या काही तासांत सरकार कोसळले तर राजकीय नेत्यांना तरुणांनी पळून पळून मारले. राजकीय नेत्यांना त्यांचा पदभार सोडून देश सोडावा लागला. नेपाळी संतप्त तरुणांनी राजकीय नेत्यांची घरे पेटवून दिली आणि एका नेत्याच्या पत्नीला जीवंत जाळले. या आंदोलनामुळे Gen-Z ची चर्चा संपूर्ण जगात रंगली. भारतामध्ये देखील आता Gen-Z ची चर्चा सुरु झाली असून भाजपच्या नेत्यांनी कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशामध्ये मतचोरी सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी करत आहेत. त्यांच्या या दाव्याला Gen-Z तरुणांचा पाठिंबा असल्याचे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी ” Gen-Z ” यांना पाठिंबा देण्याच्या विधानावरून राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. राहुल गांधींनी देशातील या पिढीला लोकशाही आणि संविधानाचे रक्षक म्हटले आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्षातील पिढीजात राजकारण आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत दुबे यांनी राहुल गांधींना देश सोडण्याची तयारी करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल गांधींनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्यावर “मत चोरांचे संरक्षक” असल्याचा आरोप केल्याने वाद सुरू झाला. त्यांनी “एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, देशाची तरुण पिढी, म्हणजेच ” Gen-Z “, आता मतांची चोरी थांबवेल आणि संविधानाचे रक्षण करेल. त्यांनी या लढाईत तरुणांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले. या विधानावर प्रतिक्रिया देताना, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस नेत्यावर टीकास्त्र डागले.
देश के Yuva
देश के Students
देश की Gen Z
संविधान को बचाएंगे, लोकतंत्र की रक्षा करेंगे और वोट चोरी को रोकेंगे।मैं उनके साथ हमेशा खड़ा हूं।
जय हिंद! pic.twitter.com/cLK6Tv6RpS
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 18, 2025
जनरल झेड यांचा घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर हल्ला
राहुल गांधींच्या पोस्टला उत्तर देताना निशिकांत दुबे यांनी ‘एक्स’ वर लिहिले, “जनरल झेड घराणेशाहीच्या विरोधात आहेत. नेहरू, इंदिरा, राजीव आणि सोनियांनंतर ते राहुल गांधींना का सहन करतील? ते भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत, ते तुम्हाला का हाकलून लावणार नाहीत?” दुबे एवढ्यावरच थांबले नाहीत, पुढे म्हणाले, “ते बांगलादेशात इस्लामिक राष्ट्र आणि नेपाळमध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करू इच्छितात. ते भारताला हिंदू राष्ट्र का बनवत नाहीत? तुम्ही देश सोडण्याची तयारी करा, तो येत आहे…” त्यांच्या ट्विटमुळे राजकारणात एक नवीन खळबळ उडाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राहुल यांनी निवडणूक आयोगावर आरोप काय?
पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी कर्नाटकचे उदाहरण देत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी आरोप केला की कर्नाटकातील सुमारे ६,८०० मते पद्धतशीरपणे वगळण्यात आली. त्यांच्या मते, कर्नाटक सीआयडीने १८ महिन्यांत निवडणूक आयोगाकडून उत्तरे मागण्यासाठी १८ पत्रे लिहिली, तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, जो आयोगाच्या सहभागाचे संकेत देतो. तथापि, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप ताबडतोब फेटाळून लावले आणि ते खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले. आयोगाने स्पष्ट केले की मते ऑनलाइन हटवता येत नाहीत आणि यासाठी एक निश्चित प्रक्रिया आहे.