Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत जय पवारांची मोठी एन्ट्री! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची मास्टरस्ट्रोक रणनीती

अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत, पवार कुटुंबाने पक्षावरील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 06, 2026 | 05:45 PM
CP, Jai Pawar, Sunetra Pawar, Praful Patel, Maharashtra Politics, Breaking News,

CP, Jai Pawar, Sunetra Pawar, Praful Patel, Maharashtra Politics, Breaking News,

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा प्रभाव
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीत जय पवारांची एंट्री मोठ्या हालचाली सुरू
  • पवार कुटुंबाकडून मात्र पक्षाची सूत्रे आपल्याच हातात राहतील याची काळजी
 NCP Explainer:   राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च कार्यकारिणीत अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांना सामील करण्यात आले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत, पवार कुटुंबाने पक्षावरील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पण त्याचवेळी यावरून राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे.

घराणेशाही की राजकीय गरज?

जय पवार यांचा राष्ट्रवादीच्या सर्वोच्च कार्यकारणीत अधिकृत प्रवेश केवळ कौटुंबिक नियुक्ती नसून, त्यामागे एक मोठी राजकीय रणनीती असल्याचे बोलले जाते. याचे कारण म्हणजे, अजित पवार यांच्या पश्चात गेल्या काही दिवसांत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. पण त्याचवेळी पवार कुटुंबाकडून मात्र पक्षाची सूत्रे आपल्याच हातात राहतील याची काळजी घेतली आहे.

Baramati News : “…म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था; बारामती पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवारांनी साधला

अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली आहे. त्यानंतर आता धाकटे चिरंजीव जय यांना कोअर कमिटीत स्थान देऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत दोन मजबूत ‘पॉवर सेंटर्स’ तयार केल्याचे दिसत आहे.

पटेल विरुद्ध पवार: वादाची ठिणगी?

त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गतही सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. १६ फेब्रुवारी रोजी पक्षाच्या संविधानात दुरुस्ती करून राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांना समान अधिकार देण्यात आले होते. मात्र, १० मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून २८ जानेवारीपूर्वीचा सर्व पत्राचार अमान्य करण्याची मागणी केली. हे पाऊल प्रफुल्ल पटेल यांच्या वाढत्या अधिकारांना लगाम लावण्यासाठी करण्यात आल्याचही मानले जात आहे.

दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रफुल्ल पटेल हे सुनेत्रा पवारांकडून पक्षाची कमान हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता.

Sunetra Pawar PC: दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन

अजित पवारांच्या मृत्यूचे गूढ आणि विलीनीकरण

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण अंतिम टप्प्यात होते, परंतु त्यांच्या जाण्यानंतर ही प्रक्रिया सध्या ठप्प झाली आहे.

‘सुनेत्रा’ युगाची सुरुवात

अजित पवारांच्या ४० वर्षांच्या राजकीय वारशाचा आधार घेत सुनेत्रा पवार आता स्वतःचे नेतृत्व सिद्ध करत आहेत. जय आणि पार्थ या दोन्ही पुत्रांना सक्रीय राजकारणात आणून त्यांनी भविष्यातील नेतृत्वाची फळी तयार करताना दिसत आहे. यामुळे पक्षात आता इतर नेत्यांची भूमिका केवळ ‘सल्लागार’ म्हणून मर्यादित राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

Web Title: Jai pawar enters ncp core committee sunetra pawar tightens grip on party post ajit pawars demise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.