Pune Municipal Election 2026: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुंड आंदेकरच्या कुटुंबातील दोघांना उमदेवारी...; तुरुंगातून लढवणार निवडणूक
Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यापूर्वी गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिलादेखील उमेदवारी जाहीर केली होती. त्यानतंर आता पुण्यातील गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोघांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पुणे गुन्हेगारीमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांवर कितपत विश्वास ठेवायचा, असा प्रश्नही यावरून उपस्थित होत आहे.
दरम्यान, बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आदेकर यांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. यानंतर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यंनी २७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण किंवा घोषणाबाजी करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे आंदेकर यांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान कठोर नियमांचे पालन करावे लागणार आहे.
दरम्यान, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या 5 कोटी 40 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्या दोघीही कारागृहात आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आता बंडू आंदेकर आणि संबंधितांना प्रचार करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ, शक्तीप्रदर्शन किंवा नियमभंग करता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
India Politics: “एक-एक घुसखोराला हाकलवून…”; अमित शहांचा ममता बॅनर्जींवर प्रहार
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचे नातेवाईक गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर आंदेकर टोळीतील अंतर्गत वाद अधिक चिघळले. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय 70, रा. नाना पेठ) याच्यासह 13 जणांविरोधात खून तसेच मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खटल्यातील आरोपी आणि बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा उर्फ कृष्णराज आंदेकर (36) हा आयुष कोमकरच्या हत्येनंतर फरार झाला होता. काही दिवसांपूर्वी बंडू आंदेकर यांनी सार्वजनिकपणे “कृष्णाचा शोध द्या, अन्यथा त्याचा एन्काउंटर होईल,” असा दावा केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर स्वतःहून समर्थ पोलीस ठाण्यात हजर झाला. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील गुन्हेगारी व राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि प्रशासनाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.






