Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रकरणाच्या सुनावणीवर यापूर्वीही न्यायमूर्तींच्या बदलाचा परिणाम होता. यापूर्वीचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचीही दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 10, 2026 | 01:09 PM
5.8 million Kunbi records to be displayed in Gram Panchayats.

5.8 million Kunbi records to be displayed in Gram Panchayats.

Follow Us
Follow Us:
  • याचिकाकर्ते आणि राज्य सरकारचा युक्तिवादही अंतिम टप्प्यात
  • न्यायमूर्ती घुगे यांची बदली झाल्यास मुंबई उच्च न्यायालयाला नवीन पूर्णपीठ स्थापन करावे लागेल
  • यापूर्वी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाल्यामुळे ही सुनावणी थांबली होती.
Maratha Reservation Breaking Update:  मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमू्र्तीपदी नियुक्त करण्यात यावी, अशी शिफारस सर्वोच् न्यायालयाच्या न्यायवृंदाने केंद्र सरकारकडे केल्याची माहिती आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची नियुक्त कोलकाता उच्च न्यायालयात झाल्याच त्याचा मराठी आरक्षणाच्या सुनावणीवर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

याचे कारण म्हणजे, न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता न्यायालयच्या नियुक्ती झाली मराठी आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडू शकते.न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पूर्णपीठासमोर मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर (Full Bench) सुनावणी सुरू आहे.

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

राज्य सरकारने 2024 मध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय अधिनियम जारी केला होता. पण मुंबई उच्च न्यायालयात या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर रवींद्र व्ही. घुगे, न्यायमूर्ती एन. जे. जमादार आणि न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. या पीठासमोर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रकरणात विविध याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठ्ये युक्तिवाद करणार आहेत. मराठा आरक्षणाचे प्रकरण सुनावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले असतानाच न्यायमूर्ती घुगे यांच्या पदोन्नतीची शिफारस कऱण्यात आली आहे. त्यामुळे पेच वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!

यापूर्वीही न्यायमूर्तींच्या बदलामुळे सुनावणीवर परिणाम

मराठा आरक्षणाच्या प्रकरणाच्या सुनावणीवर यापूर्वीही न्यायमूर्तींच्या बदलाचा परिणाम होता. यापूर्वीचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचीही दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. देवेंद्र कुमार यांच्या बदलीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई उच्च न्यायालयाने तीन न्यायमूर्तींचे नवीन पूर्णपीठ स्थापन करण्यात आले. या नवीन पूर्णपीठाने २०२५ पासून प्रकरणाची सुनावणी पुढे नेली आहे. त्यामुळे आता पुन्हा खंडपीठाच्या रचनेत बदल झाल्यास पुढील सुनावणीच्या प्रक्रियेबाबत प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाचे पुढील घडामोडींकडे लक्ष

मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि सामाजिक क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. २०२४ मध्ये करण्यात आलेल्या कायद्यानुसार मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेचा अंतिम निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीतून होणार आहे.

सध्या राज्य सरकारच्या वतीने युक्तिवाद सुरू असतानाच न्यायमूर्ती घुगे यांच्या संभाव्य बदलीची किंवा पदोन्नतीची बातमी समोर आल्याने सुनावणीला पुन्हा विलंब होणार का, नवीन पूर्णपीठाची स्थापना करावी लागणार का आणि आतापर्यंत झालेली सुनावणी पुढे कोणत्या पद्धतीने नेली जाणार, याकडे मराठा समाजासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

Web Title: Justice ravindra ghuge recommended as calcutta high court chief justice maratha reservation impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • Maratha Reservation
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…
2

High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?
3

ECI Appointment Case Supreme Court: निवडणूक आयुक्त नियुक्तीचा निर्णय ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे जाणार?

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका
4

Gunratna Sadavarte : लालबागचा राजा मंडळांविरुद्ध गुणरत्न सदावर्ते आक्रमक, हायकोर्टात दाखल करणार याचिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.