Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Election Commission Controversy : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांवर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया थांबवण्यासह मतदारांची नावे पुनर्स्थापित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 09:50 PM
SIR वरून मोठी कायदेशीर लढाई; ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील प्रक्रियांना कोर्टात आव्हान

SIR वरून मोठी कायदेशीर लढाई; ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील प्रक्रियांना कोर्टात आव्हान

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील काही निर्णय आणि प्रक्रियांवर याचिकेत आक्षेप.
  • दोन निवडणूक आयुक्तांनी विविध मुद्द्यांवर 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा संदर्भ.
  • महाराष्ट्रातील SIR थांबवून कथितरीत्या वगळलेली नावे पुनर्स्थापित करण्याची मागणी.
 

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाच्या कामकाजावरून देशात राजकीय आणि कायदेशीर चर्चा सुरू असतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील काही निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रियांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. प्रथमेश गोपाळ गवाणकर, गौरव सूर्यकांत नाखरेकर, आदेश शशिकांत भाटकर आणि स्मिताली निलेश नार्वेकर यांनी ही याचिका दाखल केल्याचं वृत्त आहे. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲड. असीम सरोदे यांच्यासह वकिलांचं पथक बाजू मांडत आहे.

याचिकेत निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. विशेषतः आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी विविध निर्णय आणि प्रक्रियांवर 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा मुद्दा मांडण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत किमान 14 वेळा काही निर्णय आणि आदेशांवर आक्षेप नोंदवले होते. हे आक्षेप मतदारांची नावे समाविष्ट करणे, वगळणे आणि पुनर्स्थापित करणे, Form-6 तसेच मतदार यादीच्या डेटाबेसशी संबंधित होते.

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

मतदार यादी, Deletion आणि ECINet प्रणालीवर सवाल

याचिकेत मतदार नोंदणीची प्रक्रिया, मतदारांची नावे वगळणे, मतदार यादीचा डेटाबेस, Electoral Registration Officers म्हणजेच ERO यांची भूमिका आणि ECINet प्रणालीच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, या प्रक्रियांमध्ये नियम आणि कायदेशीर तरतुदींचं पालन झालं का, याची तपासणी होणं आवश्यक आहे. मात्र हे सध्या याचिकेत करण्यात आलेले दावे असून त्यावर न्यायालयीन निर्णय झालेला नाही.

2023 च्या कायद्यात काय आहे?

‘Chief Election Commissioner and Other Election Commissioners (Appointment, Conditions of Service and Term of Office) Act, 2023’ मधील कलम 18 नुसार आयोगाचं कामकाज शक्य तितकं एकमताने चालवण्याची तरतूद आहे. मात्र आयुक्तांमध्ये मतभेद झाल्यास बहुमताच्या मतानुसार निर्णय घेण्याची तरतूदही त्याच कलमात आहे. त्यामुळे याचिकेत उपस्थित करण्यात आलेला मुख्य कायदेशीर प्रश्न हा संबंधित निर्णय आणि प्रशासकीय प्रक्रिया या कायदेशीर चौकटीत झाल्या का, याच्याशी संबंधित आहे.

महाराष्ट्रातील SIR थांबवण्याची मागणी

याचिकेत महाराष्ट्रात सुरू असलेली Special Intensive Revision म्हणजेच SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. SIR दरम्यान मतदार यादीतून कथितरीत्या अनधिकृत पद्धतीने वगळण्यात आलेली नावं पुन्हा समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसंच मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र न्यायिक समिती स्थापन करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (महाराष्ट्र दिनमान)

दरम्यान, SIR आणि निवडणूक आयोगाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवरून देशात राजकीय वादही सुरू आहे. आयोगाने मात्र दोन आयुक्तांकडून व्यक्त झालेली मतभिन्नता ही संस्थात्मक चर्चेचा भाग असल्याचं सांगत SIRसह महत्त्वाचे निर्णय आयोगाने एकमताने घेतल्याचं म्हटलं आहे. आता कोल्हापूर खंडपीठ या याचिकेवर काय भूमिका घेतं आणि याचिकेतील मागण्यांवर कोणते निर्देश दिले जातात, याकडे लक्ष लागलं आहे.

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

Web Title: Election commission controversy gyanesh kumar petition against ec kolhapur bench sir maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • election commission of india
  • kolhapur news
  • SIR

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
1

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध
2

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात
3

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…
4

High Court on DJ-Loudspeaker: सण-उत्सवांत डीजे- लाऊडस्पीकर वाजवायचाय? आधी ‘ही’ बातमी वाचाच, नाहीतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.