Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार्यकर्त्यांना ताकद देऊन पक्ष संघटना मजबूत करणार…; भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांची ग्वाही

भाजप साताऱ्यामध्ये नवीन उत्साह आहे. साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी पदभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • By प्रीति माने
Updated On: May 16, 2025 | 06:54 PM
Karad South MLA Dr. Atul Bhosale addressed the press after accepting the post of Satara District President.

Karad South MLA Dr. Atul Bhosale addressed the press after accepting the post of Satara District President.

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्षांची यादी समोर आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात आमदार अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. आगामी काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना ताकद देण्याचे काम करणार आहोत . जिल्ह्यात मोठी विकास कामे आणण्याच्या दृष्टिकोनातून पक्ष संघटनेची ध्येयधोरणे राबवली जातील असा स्पष्ट विश्वास भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

शासकीय विश्रामगृहांमध्ये आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोज घोरपडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर , आनंदराव पाटील, डॉक्टर दिलीप येळगावकर,सातारा लोकसभा समन्वयक सुनील काटकर, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,शहराध्यक्ष अविनाश खर्शीकर, माजी शहराध्यक्ष विकास गोसावी,राहुल शिवनामे इत्यादी यावेळी उपस्थित होते .

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

यावेळी आमदार अतुल भोसले म्हणाले की, “भाजपच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्त झाल्याबद्दल पक्षाच्या वतीने साताऱ्यात झालेल्या स्वागताने मी भारावलो आहे. भाजप पक्ष जिल्ह्यात मजबूत आहे. पक्षाचे चार आमदार येथे निवडून आले असून त्यापैकी दोन मंत्री आहेत पक्ष संघटना वाढवल्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. केंद्रात व राज्यात आपले सरकार असल्यामुळे यापुढील काळात आम्ही मोठी विकास कामे जिल्ह्यात आणणार आहोत. अध्यक्षपदाच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणे जुने पदाधिकारी कार्यकर्ते यांना विश्वासाने सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत. राज्यात महायुतीची सत्ता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो मान्य आहे. भाजप कार्यकर्ता कामाने मोठा होतो . आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्हाध्यक्ष पदासाठी इतर नावे पुढे येत होती अचानक तुमचे नाव पुढे कसे आले ? या प्रश्नावर डॉक्टर भोसले म्हणाले “हा संशोधनाचा विषय आहे. मी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नव्हतो उलट व इतर कार्यकर्त्यांची नावे सुचवली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने मला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिल्ह्यात खासदार उदयनराजे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची जाहीर केले आहे. आगामी पालिका निवडणुकीत विशेषतः साताऱ्यात कमळ चिन्ह की आघाडी हा विषय कसा सोडवणार यावर मी बोलू शकत नाही,” असे विधान अतुल भोसले यांनी केले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे पाहत हे वाक्य उच्चारल्यावर दोघेही दिलखुलास हसले. त्यावर ही प्रेस जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांची आहे त्यामुळे मी बोलू शकत नाही,” असे विधान बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी केले .सातारा राजधानीत दोन्ही राजांचा निर्णय अंतिम असतो त्यामुळे पालिका निवडणुका संदर्भातील निर्णय दोन्ही राजेच घेतील त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल असे भोसले यांनी स्पष्ट केले.

Web Title: Karad south mla dr atul bhosale addressed the press after accepting the post of satara district president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Dr Atul Bhosale
  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक
1

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
2

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
3

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार
4

Nanded News : अशोक चव्हाण यांचे स्वप्न उतरणार सत्यात? ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’चा प्रकाशन सोहळा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.