सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा सदस्य नसल्यामुळे खासदार संजय राऊत सर्वपक्षीय शिष्टमंडळावरुन आक्रमक झाले (फोटो - सोशल मीडिया)
छत्रपती संभाजीनगर : खासदार संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग या पुस्तकाचे अद्याप प्रकाशन झालेले नाही. मात्र त्यापूर्वीच या पुस्तकातील गोष्टींवरुन वाद निर्माण झाला आहे. खासदार राऊत यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये अमित शाह यांनी त्यांच्या परिवाराला बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवले आहे असा दावा केला आहे. तसेच अनेक मुद्द्यांवरुन हे पुस्तक प्रकाशन सोहळ्यापूर्वी चर्चेत आले आहे. यानंतर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर चर्चा केली आहे. संजय शिरसाट यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत यांना लिहिण्याचा छंद आहे. ही चांगली गोष्ट आहे, त्यांनी वास्तविकता लिहावी. जित्याची खोड मेल्याशिवाय जात. शिवसेना प्रमुखांची मदत सगळ्या नेत्यांना झाली आहे. पुस्तक पाहिलं तर पिक्चरची स्क्रिप्ट वाटतीये. कॉमन लोकांना कळत स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रकार आहे, आणि त्यांनी ते लिहिलं आहे,” असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार संजय शिरसाट पुढे म्हणाले की, “पुस्तकात शरद पवार यांच्या नावाचा जाणून बुजुन उल्लेख केला, त्यांना गुंतून ठेवलं. मोदी यांना पंतप्रधान करा, ही पहिली मागणी शिवसेना प्रमुखांनी केली होती. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना मदत केली, आणि त्याची वाचता देखील केली नाही. आमच्या सारखे मोठे झाले, त्यांना शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं आहे. शरद पवारांनी मदत केली. हे शरद पवार बोलले तर महत्त्व आहे. तुम्ही कशाला दलाली करता. गुजरात दंगल कशामुळे घडलं. तेव्हा शिवसेना प्रमुख काय बोलले होते तुम्हाला आठवत का? गोदरा हत्याकांड तुम्हाला आठवत नसेल, तर तुम्ही हिंदुत्ववादी कसे?” असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
हे मी नाकारत नाही…
आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांना इशारा देखील दिला आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही चोरी चपट्या केल्या नव्हत्या. खऱ्या शिवसैनिकांच्या हातात शिवसेना आली आहे. लोकांनी तुम्हाला नाकारला आहे. बोलायला लाऊ नका. आम्हाला तोंड उघडायाला लाऊ नका, नसता त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे. संजय राऊत काहीही करू शकतो, इंग्लिश मध्ये प्रकाशन करू शकतो. राहुल गांधी यांना शिवसेना प्रमुखांपेक्षा मोठे वाटतात. आता अमित शहा यांना शिवसेना प्रमुखांनी मदत केली आहे, हे मी नाकारत नाही, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कधीही होणार नाही,” असे देखील स्पष्ट मत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये राजकीय वाद सुरु आहे. याबाबत जोरदार टीका सुरु असताना संजय शिरसाट म्हणाले की, “पालकमंत्री पद राजकीय नाही, हे त्यांना समजून सांगा. त्या कार्यालयात खाजगी कर्मचारी नाही. कलेक्टर ऑफिसचे कर्मचारी त्या ऑफिसमध्ये बसतात. पालकमंत्री त्या त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. जनतेचे काम करण्यासाठी कार्यालय आहे,” असे स्पष्ट मत आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.