
काय म्हणाले थोरवे ?
महायुतीचे प्रमुख म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी भाजपला कर्जत पंचायत समिती आणि शेतकरी कामगार पक्ष यांना प्रत्येकी तीन जागा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी भाजपकडून अर्ज भरले होते, वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आणि एक वगळता सर्व अर्ज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागे घेतले आहेत. उरणमध्ये आमचे एक दोन अर्ज राहिले असून काही कार्यकर्ते अतीउत्साही असतात आणि ते लढत आहेत.त्यामुळे त्यांना त्यांची ताकद अनुभवायची संधी दिली आहे,मात्र शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल असा विश्वास आमदार थोरवे यांनी केला. तर तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार असून 22 गटांपैकी एका जिल्हा परिषद गटात अशी लढत होत आहे.
भाजप माणगाव तर्फे वरेडी येथे भाजप कार्यकर्ते कोणाचे काम करणार याचा निर्णय आम्ही एकत्र येऊन घेऊ असे उत्तर भाजप सरचिटणीस बेहेरे यांनी दिले. आरपीआय आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आमचे कार्यकर्ते नाराज नाहीत असे यावेळी जाहीर केले.आमचे दोन फॉर्म भरले होते पण अर्ज बाद झाले, नाहीतर आम्ही या ठिकाणी लढणार होतो. आमदार थोरवे यांनी एसी जागा असती तर आरपीआयला त्या ठिकाणी संधी दिलीच असती.
सुनील तटकरेंसारख्या हाय प्रोफाइल नेत्याला कर्जतमध्ये घरोघरी येऊन प्रचार करावा लागत आहे ही परिस्थिती आणली आहे, हे माझ्यामुळे आली असल्याचे सर्वांना मान्य करावे लागेल असे आमदार महेंद्र थोरवे यांनी दाखवून दिले. विधानसभेत राष्ट्रवादीला जे यश मिळाले नाही, त्यामुळे उबाठाला सोबत घेऊन प्रयत्न करीत असून आमची महायुती सक्षम आणि भक्कम आहे.
शेकाप तालुका चिटणीस तानाजी मते यांनी शेकापने परिवर्तन विकास आघाडीची साथ ही आम्ही ते आमचा वापर करून घेतात आणि बाजूला ठेवतात, असे दिसून आल्याने आम्ही या ठिकाणी महायुती मध्ये सहभागी झालो असल्याचे यावेळी जाहीर केले. आमचा संपूर्ण पक्ष यावेळी महायुतीसोबत असल्याचे शेकापने यावेळी जाहीर केले. आम्ही शेकाप निवडणुकीची गणितं आर्थिक बनली असल्याने आम्ही आमची ताकद असल्याच्या ठिकाणी देखील आम्ही उमेदवार देऊ शकलो नाही. पण आम्हाला आमदार थोरवे यांच्याकडून कळंब आणि कशेळे भागातील उमेदवार यांना तुमचेच आहेत असे समजून त्यांना निवडून आणण्याचे आवाहन केले असून आम्ही ती उणीव भरून काढणार असल्याचे मत यांनी जाहीर केले.
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर,भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे,आरपीआय आठवले गट जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शेकाप तालुका चिटणीस तानाजी मते,जिल्हा खजिनदार श्रीराम राणे,भाजपचे तानाजी चव्हाण,भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष दिनेश रसाळ तसेच माजी नगराध्यक्ष शरद लाड,आदी प्रमुख उपस्थित होते.