Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kishori Pednekar : पेंग्विनवरून राजकारण नको, आधी मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवा! किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Kishori Pednekar : मुंबईतील पेंग्विनवरून सुरू असलेल्या राजकारणावर किशोरी पेडणेकर यांची टीका. पेंग्विन आणण्यापेक्षा दिवाळीनंतरच्या पाणीटंचाईकडे लक्ष द्या, असा सत्ताधाऱ्यांना टोला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 06, 2026 | 06:09 PM
Kishori Pednekar : पेंग्विनवरून राजकारण नको, आधी मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवा! किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Kishori Pednekar : पेंग्विनवरून राजकारण नको, आधी मुंबईकरांचा पाणीप्रश्न सोडवा! किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Follow Us
Follow Us:
  • काही पेग्विन म्हैसूरला पाठवण्याची चर्चा
  • मुंबईत पाणी टंचाईचा मोठा प्रश्न
  • प्रदूषणाच्या प्रश्नावरही लक्ष वेधले
 

मुंबईत पेंग्विन आणण्याच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पेंग्विन आणण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. त्यावेळी विरोध करणारेच आता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सध्या पेंग्विन आणण्यापेक्षा मुंबईकरांना पाणी देण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे पेडणेकर यांनी सुनावले.

पेंग्विनची संख्या आता 25 झाली असून, त्यातील काही जोड्या म्हैसूरला पाठविण्याची चर्चा आहे. त्यासाठी काही अधिकारी भेट देऊन गेल्याचेही समजते. त्याऐवजी मुंबईत जिराफ आणि सिंह आणले जाणार असल्याची माहिती मिळत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.

पेंग्विन मुंबईत आणले तेव्हा याच लोकांनी त्यावरून मोठे राजकारण केले होते. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतरही टीका करण्यात आली. मात्र, आज हेच पेंग्विन मुंबईकरांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात भर घालत आहेत. प्राणी-पक्ष्यांची देवाणघेवाण ही काही नवीन बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांना पेंग्विन नको, आधी पाणी द्या!

मुंबई सध्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येला सामोरी जात आहे. दिवाळीनंतर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष दिसत नाही. नागरी सुविधांच्या प्रश्नांवरही चर्चा होत नाही. पक्षी आणले पाहिजेत, त्याला आमचा विरोध नाही; पण ही त्याची वेळ नाही. सध्या मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे त्यांना पेंग्विनपेक्षा पाणी महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली.

गेली साडेचार ते पावणेपाच वर्षे मुंबई महापालिकेत नगरसेवकांची लोकनियुक्त सभा नव्हती. आता नगरसेवक निवडून आले आहेत, महापौरही विराजमान झाले आहेत. अशा वेळी मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी सीए आणा, पेंग्विन आणा, अशा विषयांवर चर्चा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

Sharad Pawar Health Update : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, डिस्चार्जबाबत दिली मोठी माहिती

पेंग्विन आणण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. ती इतकी यशस्वी ठरली की आता त्याची दखल घ्यावी लागत आहे. मात्र, त्याचे श्रेय घेऊन मिरवण्याची ही वेळ नाही. मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर आधी चिंता व्यक्त करा, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.

प्रदूषणाच्या प्रश्नावरही लक्ष वेधले

मुंबईकरांचे आरोग्य, वाढते प्रदूषण आणि नागरी समस्यांवरही सत्ताधाऱ्यांनी बोलले पाहिजे, असे पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि दृश्य प्रदूषण वाढत आहे. राजकारणातही प्रदूषण निर्माण झाले असून, या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.

Raj Thackeray on Gokul pawer Struggle: भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा…; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात

💡

Frequently Asked Questions

  • Que: किशोरी पेडणेकर यांनी पेंग्विनच्या मुद्द्यावरून कोणावर टीका केली?

    Ans: पेंग्विन आणण्याला पूर्वी विरोध करणारेच आता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.

  • Que: पेंग्विन आणण्याची संकल्पना कोणाची होती?

    Ans: मुंबईत पेंग्विन आणण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

  • Que: मुंबईतील पेंग्विनची संख्या किती झाली आहे?

    Ans: पेडणेकर यांच्या माहितीनुसार, मुंबईतील पेंग्विनची संख्या आता 25 झाली आहे.

Web Title: Kishori pednekar penguin politics mumbai water shortage rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • AadityaThackeray
  • Kishori Pednekar
  • shivsena

संबंधित बातम्या

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम
1

Ulhasnagar Metro Project: मेट्रोचे श्रेय भाजपचे की शिवसेनेचे? शहाड ब्रिजवरूनही राजकीय संघर्ष; कुमार आयलानी विरुद्ध कमलेश निकम

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल
2

‘5 हजार रुपयांत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार का?’ आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल

BMC भाजपच्या दावणीला बांधली आहे का? Dia Mirza यांच्या व्हिडीओवरून Kishori Pednekar यांचा घणाघाती सवाल
3

BMC भाजपच्या दावणीला बांधली आहे का? Dia Mirza यांच्या व्हिडीओवरून Kishori Pednekar यांचा घणाघाती सवाल

Pratap Sarnaik : सरनाईकांविरोधात भाजपचे आंदोलन; शिवसेना महिला आघाडीने आरसे दाखवत दिले प्रत्युत्तर!
4

Pratap Sarnaik : सरनाईकांविरोधात भाजपचे आंदोलन; शिवसेना महिला आघाडीने आरसे दाखवत दिले प्रत्युत्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.