भाजपने गोकुळमध्ये रडीचा डाव बंद करावा...; सतेज पाटलांसाठी राज ठाकरे मैदानात
निवडणुकीनंतर गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकारही दिला जाणार आहे. निवडणुकीनंतर भाजपने टाकलेल्या या डावामुळे सतेज पाटील (Satej Patil) यांच्या समविचारी आघाडीच्या तोंडचा अध्यक्षपदाचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसने कोर्टात जाण्याची तयारीही ठेवली आहे. पण गोकुळमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षावरून आता राज ठाकरेही सतेज पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मिडिया ट्विटर एक्स अकाऊंटवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
BJP Mira Bhayandar: मिरा-भाईंदरमध्ये क्लस्टर योजनेवरून भाजपची भूमिका बदलली? आधी विरोध, आ
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे 12 विरोधात सतेज पाटील पॅनलचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे (म्हणजे तुमचेच) 5 संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार…सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !” असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Ans: सतेज पाटील यांच्या पॅनेलला १३ जागांचे स्पष्ट बहुमत मिळूनही, भाजप गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही म्हणून शासननियुक्त संचालक लादून 'रडीचा डाव' खेळत असल्याचा घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला.
Ans: "केवळ भाजप हाच असा पक्ष आहे जो सत्तेत असूनही विरोधी पक्षाविरोधात 'लोकशाही वाचवा' मोर्चे काढतो; पण गोकुळमध्ये स्वतःच लोकशाहीची पायमल्ली करतो," असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
Ans: काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील सतेज पाटील आणि गोकुळच्या ५.५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.






