Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मनपामध्ये चाललंय तरी काय ? करवाढीचा शाळांना फटका; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मिरा-भाईंदर महानगरपालिकाच्या १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या महासभेत सत्ताधारी भाजपने नवीन मालमत्तांवर करवाढीचा ठराव मंजूर केला असून त्यावरून शहरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 02, 2026 | 02:49 PM
Mira Bhayander : मनपामध्ये चाललंय तरी काय ? करवाढीचा शाळांना फटका;  सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Follow Us
Follow Us:
  • मीरा भाईंदर मनपामध्ये चाललंय तरी काय ?
  • करवाढीचा शाळांना फटका; सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
भाईंदर/ विजय काते : मिरा-भाईंदर महानगरपालिकाच्या १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पहिल्या महासभेत सत्ताधारी भाजपने नवीन मालमत्तांवर करवाढीचा ठराव मंजूर केला असून त्यावरून शहरात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या करवाढीत शैक्षणिक संस्थांनाही सूट देण्यात आलेली नसल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. उलट हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, मॉल्स आदी व्यावसायिक आस्थापनांना जुनाच दर लागू ठेवल्याने सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पालिकेत साडेतीन वर्षे प्रशासकीय राजवट राहिल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच महासभेत बहुमताच्या जोरावर हा करवाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला असला तरी तोकड्या संख्येमुळे त्यांचा विरोध निष्फळ ठरला.
१ एप्रिलपासून नवे दर लागू १ एप्रिलपासून नव्याने कर कक्षेत येणाऱ्या मालमत्तांवर निवासी दराने प्रती चौरस फूट प्रती महिना १ रुपया ६० पैसे, तर व्यावसायिक मालमत्तांवर १ रुपया ५० पैसे करवाढ लागू करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वातील निवासी दर २ रुपये ४० पैसे, तर व्यावसायिक दर ४ रुपये ५० पैसे इतका आहे.
या ठरावात नवीन शाळा, महाविद्यालये यांनाही करवाढीच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक संस्थांना व्यावसायिक दराने कर आकारणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यानुसार काही संस्थांना प्रती चौरस फूट ६ रुपये इतका कर भरावा लागू शकतो.

Mira Bhayander : निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावर मुक्काम; पोलीस भरती उमेदवारांची परवड

शैक्षणिक शुल्क वाढीची भीती
नवीन शाळांवर वाढीव कर लादल्यास त्याचा परिणाम थेट शैक्षणिक शुल्कावर होणार असल्याची भीती पालक व्यक्त करत आहेत. आधीच अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये निवासी व व्यावसायिक दरात फरक असल्याने शुल्कात तफावत दिसून येते. त्यात नव्या शाळांवर वाढीव कर लागू झाल्यास शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंगना दिलासा?
याउलट शहरातील हॉटेल्स, मॉल्स, लॉजिंग-बोर्डिंग, मंगल कार्यालये व लॉन्स यांना जुनाच करदर लागू ठेवण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांनी व्यावसायिक क्षेत्राला अभय दिल्याचा आरोप होत आहे. शहराची प्रतिमा आधीच डान्स बार व इतर व्यावसायिक आस्थापनांमुळे मलीन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय वादग्रस्त ठरत आहे.

झोपड्यांवरही वाढ
नवीन झोपड्यांच्या निवासी दरात तब्बल २ रुपये ४० पैसे म्हणजेच सुमारे ४०० टक्के वाढ करण्यात आल्याचा आरोप आहे. झोपड्यांच्या व्यावसायिक वापरासाठी ६ रुपये दर मंजूर करण्यात आला असून पूर्वी निवासी दरानेच कर आकारला जात होता. त्यामुळे गोरगरीबांच्या माथीही करवाढीचा बोजा टाकल्याची भावना व्यक्त होत आहे.दरम्यान, या ठरावावरून शहरात राजकीय वातावरण तापले असून सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. आगामी काळात या करवाढीच्या निर्णयावरून महापालिकेत आणि शहरात राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

वाहतूक कोंडीतून होणार सुटका! दहिसर पथकर नाका येथे सॅटेलाइट शुल्कवसुली यंत्रणा उभारणार

Web Title: What is going on in the municipality tax hike hits schools question mark on the role of the ruling party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mira Bhayandar Municipal Corporation
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.