Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News : “विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा” शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका

मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना ही तोडणार, मारझोड करणार, फोडणार, फेकून देणार असे नकारात्मक राजकारण उद्धव आणि राज ठाकरे करत आहेत, असे शायना एन.सी म्हणाल्या.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 13, 2026 | 06:46 PM
"विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा" शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका

"विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा" शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • विकासाचा अजेंडा नसल्याने मारझोड आणि तोडण्याची भाषा
  • शायना एन.सी यांची उद्धव व राज ठाकरेंवर टीका
  • महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना उबाठाने भ्रष्टाचार केला
मुंबई : येत्या दोन दिवसात महानगरपालिकेसाठी निवडणुका होत आहे. याचदरम्यान विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने त्यांच्याकडून तोडण्याची, मारझोड करण्याची भाषा केली जात आहे, अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या शायना एन. सी यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मुंबई महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना घोटाळे केले आणि मलिदा खाल्ला. आता त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. त्यामुळे तोडणार, मारझोड करणार, फोडणार, फेकून देणार असे नकारात्मक राजकारण उद्धव आणि राज ठाकरे करत आहेत, असे शायना एन.सी म्हणाल्या. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आणि विकासाचे राजकारण केले. समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणाचा विचार शिंदे यांनी केला, असे शायना एन.सी म्हणाल्या. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तरुणांशी संवाद साधला त्यांच्या मुंबईबाबत अपेक्षा जाणून घेतल्या. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी महायुतीने १७००० कोटी विविध प्रकल्पांसाठी आणि योजनांसाठी खर्च करण्याचे वचन दिले आहेत. हा वचनामा सत्यात उतरणारा आहे फेकनामा नाही, असा टोला शायना एन.सी यांनी लगावला.

Maharashtra Politics: अजित पवारांकडून पुणे, पिंपरी निसटणार? ‘डिझाईन बॉक्स’कंपनीवर छापेमारी

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईत देशातील सर्वोत्तम मेट्रो नेटवर्क कार्यरत आहे. तुमच्या अहंकारामुळे मेट्रो कारशेडचे काम रखडले होते. पुढे त्या प्रकल्पाची किंमत १२ हजार कोटींची वाढली, अशी टीका शायना एन.सी यांनी उबाठावर केली. मुंबई महापालिकेत कोविड सेंटर, खिचडी, बॉडीबॅग, मिठी नदी, रस्त्यांचे डांबरीकरण यात भ्रष्टाचार केला. त्यामुळे उबाठाचे नगरसेवक तुरुंगात गेले होते, असे शायना एन.सी म्हणाल्या. मुंबईकर जनतेने महायुतीची विकास कामे पाहिली आहेत त्यामुळे येत्या १५ जानेवारी रोजी मतदार महायुतीच्या बाजूनं उभे राहतील, असा विश्वास शायना एन.सी यांनी व्यक्त केला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे म्हणणाऱ्या विरोधकांवर शायना एन.सी यांनी खरमरीत टीका केली. मुंबई कोणाच्या बापाची जहागिरदारी नाही. मुंबई मराठी माणसाची आहे आणि राहणार, असे शायना एन.सी म्हणाल्या. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांनी आणि कष्टकऱ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं, असे आवाहन शायना एन.सी यांनी केले.

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल

Web Title: Lack of a development agenda leads to the language of scolding and breaking shaina nc criticizes uddhav and raj thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • shivsena

संबंधित बातम्या

NMC Election 2026 : प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपासाठी वाजतेय धोक्याची घंटा; मतदाराच्या नाराजीचा थेट फटका बसणार
1

NMC Election 2026 : प्रभाग क्रमांक ६ मध्ये भाजपासाठी वाजतेय धोक्याची घंटा; मतदाराच्या नाराजीचा थेट फटका बसणार

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल
2

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल

PMC Election: प्रभागातील व्यापारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले; अविनाश बागवे यांचे बहुआयामी कार्य
3

PMC Election: प्रभागातील व्यापारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले; अविनाश बागवे यांचे बहुआयामी कार्य

PMC Elections 2026 : प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय! उमेदवारांवर अमोल बालवडकर यांचा पूर्ण विश्वास
4

PMC Elections 2026 : प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय! उमेदवारांवर अमोल बालवडकर यांचा पूर्ण विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.