उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो- सोशल मीडिया)
नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर कारवाई
पुण्यातील डिझाईन बॉक्स कार्यालयावर छापेमारी
नरेश अरोरा अजित पवारांचे राजकीय सल्लागार
Pune Breaking News: राज्यात आज महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दरम्यान पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यासाठी प्रतिष्ठेची होणार आहे. प्रचाराची मुदत संपली असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे. क्राइम ब्रांचने पुण्यातील डिझाईन बॉक्स या कार्यालयावर छापा टाकला आहे. ही कंपनी अजित पवारांसाठी काम करत असल्याचे समोर येत आहे.
डिझाईन बॉक्स कंपनी नरेश अरोरा यांची असल्याचे समोर आले आहे. डिझाईन बॉक्स कंपनी अजित पवारांसाठी काम करत असल्याचे समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ही कंपनी अजित पवार आणि पक्षासाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. नरेश अरोरा हे अजित पवारांचे राजकीय सल्लागर असल्याचे म्हटले जात आहे. क्राइम ब्रांच डिझाईन बॉक्स कार्यालयातील कागदपात्रांची तपासणी करत असल्याचे समोर आले आहे. मात्र ही कारवाईचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आज प्रचार करण्याची मुदत संपली आहे. 15 तारखेला मतदान होणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. महेश लांडगे, मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपाना प्रत्युत्तर देखील दिल्याचे दिसून आले.
मतदान होण्याला काहीच वेळ शिल्लक असताना अचानक अजित पवारांसाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स या कंपनीवर कारवाई करण्यात आल्याने या बाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ही कारवाई नेमकी का करण्यात आली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी?
मला या कारवाईबाबत अद्याप पूर्ण माहिती नाही. हे कोणाचे कारस्थान आहे, यामागे कोणी मास्टरमाइंड आहे ते आम्ही 16 तारखेनंतर बोलू. अशा पद्धतीची धाड पडणे हे साधी गोष्ट वाटत नाही. या कारवाईला राजकीयदृष्ट्या किनार असल्याची शंका आहे. याचे आम्ही उत्तर नक्कीच देऊ.






