Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट? लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध

ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबरला मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे. मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या मोर्चाला पाठिंबा नसल्याचे सांगितल्याने आंदोलनापूर्वीच ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 25, 2026 | 07:09 PM
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध

लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला बबनराव तायवाडेंचा विरोध

Follow Us
Follow Us:
  • लक्ष्मण हाके यांचा १ सप्टेंबरला मुंबईत ओबीसी मोर्चा
  • बबनराव तायवाडेंचा मोर्चाला स्पष्ट विरोध
  • तायवाडेंच्या भूमिकेवर हाके यांची टीका
 

मुंबई : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या आंदोलनासाठी हाके यांनी राज्यभरातील ओबीसी बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन केले असून, ओबीसी नेत्यांनाही या मोर्चात सहभागी होण्याचे आवतन दिले आहे. मात्र, मोर्चापूर्वीच ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतृत्वातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

‘आमचा मुंबईच्या मोर्चाला पाठिंबा नाही’

बबनराव तायवाडे यांनी हाके यांच्या आंदोलनावर भूमिका स्पष्ट करताना सरकारच्या भूमिकेकडे आपले लक्ष असल्याचे सांगितले. सरकार ओबीसी आरक्षणाच्या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही याची खात्री करते का, यावर आपले लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

सरकारने दिलेल्या आश्वासनांवर ते ठाम राहिल्यास मुंबईत मोर्चा काढण्याची गरज नसल्याचे तायवाडे यांनी सांगितले. हाके यांच्या मागण्या स्पष्ट नसल्याचा दावाही करत त्यांनी या मोर्चाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले.

‘आमचं आंदोलन रामलीला मैदानावर’

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही तायवाडे यांनी उपस्थित केला. २०१६ पासून केंद्र सरकारकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी आगामी काळात सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून, डिसेंबरमध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही तायवाडे यांनी दिला.

‘तायवाडे इव्हेंट नेते’ – लक्ष्मण हाके

तायवाडेंच्या भूमिकेवर लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. बबनराव तायवाडे हे ‘इव्हेंट नेते’ असल्याची टीका त्यांनी केली. तायवाडे सकाळी एक, दुपारी दुसरी आणि संध्याकाळी वेगळी भूमिका घेत असल्याचा आरोप हाके यांनी केला. “आम्ही त्यांना पाठिंबा मागितलाच नाही,” असे सांगत हाके यांनी तायवाडे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेत असल्याचा आरोप केला. वर्षातून एक कार्यक्रम घेणाऱ्या तायवाडेंनी आपल्याला अधिक बोलायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

१ सप्टेंबरच्या मोर्चाकडे लक्ष

लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबरच्या मुंबईतील मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मात्र, बबनराव तायवाडे यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याने मोर्चापूर्वीच ओबीसी नेतृत्वातील मतभेद अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे १ सप्टेंबरच्या मोर्चाला ओबीसी समाजातून किती प्रतिसाद मिळतो आणि या आंदोलनामुळे सरकारवर किती दबाव निर्माण होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Laxman hake obc morcha babanrao taywade opposition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Dr. Babanrao Taiwade
  • Laxman hake
  • OBC Reservation

संबंधित बातम्या

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’
1

जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी छगन भुजबळांची समता परिषदेची बैठक; ओबीसी आरक्षणावर म्हणाले, ‘कोण म्हणतं आरक्षण संपलं?’

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
2

‘… तर मराठेही डाव टाकणार’, मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक, 29 ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.