Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रसाद लाड दिसले तर कानशिलात लगावणार’; लक्ष्मण हाके यांचा इशारा, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नवा वाद

मराठा आरक्षणाच्या वादावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील, सरकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By विवेक
Updated On: Aug 07, 2026 | 02:19 PM
prasad lad laxman hake

prasad lad laxman hake

Follow Us
Follow Us:
  • लक्ष्मण हाके यांचा प्रसाद लाड यांना आक्रमक इशारा.
  • मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार वक्तव्य.
  • सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरही साधला निशाणा
 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली आहे. प्रसाद लाड यांनी अलीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर भाष्य केल्यानंतर सुरू झालेल्या वादात हाके यांनी थेट इशाराच दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी बोलताना प्रसाद लाड यांच्यावर संताप व्यक्त केला. “प्रसाद लाड जिथे दिसतील, तिथे त्यांच्या कानशिलात लगावणार,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी हे विधान वारंवार करत आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच, “मला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण मी माझी भूमिका बदलणार नाही,” असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले लक्ष्मण हाके ?

हाके यांनी प्रसाद लाड यांच्या राजकीय वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या मागे किती लोक आहेत याचा उल्लेख केला. “तुम्हाला माझ्यामागचे लोक पाहायचे आहेत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी ओबीसी समाजाच्या एकजुटीचा उल्लेख करत, “ओबीसी समाज जागा झाला तर अनेकांचे राजकारण वाहून जाईल,” असा इशाराही दिला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या प्रेसमध्ये धनंजय मुंडेही बोलले; सुनील तटकरेंनी म्हटले, ‘आमदारांची लुडबूड…’

मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान त्यांनी काही अन्य नेत्यांवरही टीका केली. आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर बोलताना जबाबदारीने भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मंडल आयोगाच्या शिफारशींना आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जरांगे पाटलांच्या भूमिकेवरही टीका

या संपूर्ण प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही लक्ष्मण हाके यांनी टीका केली. मात्र, त्याचवेळी त्यांचा मुख्य रोख प्रसाद लाड यांच्या अलीकडील वक्तव्यांकडे होता. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद लाड यांना आवर घालावा, अशी मागणीही त्यांनी केली.

‘देवेंद्र फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, जनतेच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले’; मनोज जरांगेंना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यातील सर्वात संवेदनशील विषयांपैकी एक मानला जात असून, या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी संयम राखून संवादातून तोडगा काढण्याची गरज असल्याचे मतही विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे.

Web Title: Laxman hake warning to prasad lad maratha reservation manoj jarange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Laxman hake
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Prasad Lad

संबंधित बातम्या

Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांचा मोठा खुलासा! रामदास कदमांचं नाव घेत म्हणाले, ‘मूळ डिव्हाईस त्यांच्याकडेच!’
1

Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांचा मोठा खुलासा! रामदास कदमांचं नाव घेत म्हणाले, ‘मूळ डिव्हाईस त्यांच्याकडेच!’

Manoj Jarange Patil : ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुमच्या पाया पडतो!’ मनोज जरांगे पाटील भावुक, फायनान्स कंपन्यांना दिला इशारा
2

Manoj Jarange Patil : ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुमच्या पाया पडतो!’ मनोज जरांगे पाटील भावुक, फायनान्स कंपन्यांना दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.