Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांसमोर बंडखोरांचेच आव्हान; अंतर्गत वादामुळे वाढली धुसफूस

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रखडल्याने ही निवडणूकही रखडली होती. पैकी आता नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये निवडणूक झाली. तर जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी आहे. अशात निवडणूक घेण्याइतपत सदस्यसंख्या असल्याने ही निवडणूक होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2026 | 08:00 AM
MLC Election : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांसमोर बंडखोरांचेच आव्हान; अंतर्गत वादामुळे वाढली धुसफूस

MLC Election : विधान परिषद निवडणुकीत उमेदवारांसमोर बंडखोरांचेच आव्हान; अंतर्गत वादामुळे वाढली धुसफूस

Follow Us
Follow Us:

नागपूर : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १७ जागांसाठी राज्यात निवडणूक होऊ घातली आहे. त्यात विदर्भातील ५ जागांचा समावेश आहे. पैकी नागपुरात पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने अधिकृत उमेदवारांची घोषणा करताच इच्छुक असलेल्यांनीही बंड पुकारात शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक होईल तेव्हा होईल, पण सध्यातरी अंतर्गत आणि पक्षातीलच बंडखोरांचे आव्हान मोडून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रखडल्याने ही निवडणूकही रखडली होती. पैकी आता नगर परिषद आणि नगर पंचायतींमध्ये निवडणूक झाली. तर जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी आहे. अशात निवडणूक घेण्याइतपत सदस्यसंख्या असल्याने ही निवडणूक होत आहे. परिणामी, इच्छुकांनी निवडणुकीसाठी आधीपासूनच तयारी चालविली होती.

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट) आणि महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) ने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात काहींना लॉटरी लागली. मात्र, बऱ्याच इच्छुकांचा हिरमोड झाल्याने त्यांनी बंडाळी करत निवडणूक रिंगणात अपक्ष म्हणून उडी मारली.

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून हिंगणघाट बाजार समितीचे सभापती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अॅड. सुधीर कोठारी यांनी बंड पुकारले असून, अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. भंडारा-गोंदियात माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पूत्र प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासोबतच नरेश ईश्वरकर यांनी बंडाळी केली. विशेष म्हणजे महाआघाडीचे अधिकृत उमदेवार दिलीप बनसोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना गोपालदास अग्रवाल उपस्थित होते तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले हे गैरहजर होते.

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

प्रफुल्ल अग्रवाल यांच्या उमेदवारीवेळी ते हजर होते. यवतमाळमध्ये महायुती व महाआघाडीत डोकेदखी वाढली आहे. भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादीकडून साजिद बेग मिर्झा तसेच महाआघाडीत दारव्ह्याचे काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सय्यद फारुक सय्यद करीम रिंगणात उतरले आहे.

Web Title: Maharashtra legislative council elections candidates face a challenge from rebels themselves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • MLC Election

संबंधित बातम्या

SOLAPUR: महाविकास आघाडी एकदिलाने लढणार! फत्तेपूरकरांचा विजयाचा विश्वास
1

SOLAPUR: महाविकास आघाडी एकदिलाने लढणार! फत्तेपूरकरांचा विजयाचा विश्वास

Nashik MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण
2

Nashik MLC Election : नाशिकमध्ये महायुतीचा तिढा वाढला! उमेदवारीवरून शिंदे गट-अजित पवार गटात नाराजी, अपक्ष उमेदवारीने रंगले समीकरण

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत
3

MLC Election : साताऱ्याच्या मतांवर आता विजयाचे गणित अवलंबून; धैर्यशील कदमांच्या प्रवेशाने निवडणुकीत रंगत

Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर; परिचारकांचा पत्ता कट!
4

Solapur MLC Election: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर; परिचारकांचा पत्ता कट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.