Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : काँग्रेसला खिंडार! 2 माजी महापौरांसह 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Maharashtra Politics News: सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे.१२ माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 18, 2025 | 01:24 PM
काँग्रेसला खिंडार! 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेसला खिंडार! 12 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Follow Us
Follow Us:
  • सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ
  • १२ माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
  • जिल्ह्यात राजकीय भूकंप
Maharashtra Politics News Marathi : महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय तापमान चांगलेच तापल्याच पाहायला मिळत आहे. विविध राजकीय समीकरणे प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेबाबतही महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. दोन्ही गटांमधील संभाव्य युतीबाबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. याचदरम्यान सांगलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे.

सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि किमान १२ माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Maharashtra Politics : “कवडीमोल विकण्यापेक्षा स्वाभिमानी आंबेडकरी बाण्याने मतदान करा…”, अंजली आंबेडकर यांचे आवाहन

सांगलीत काँग्रेसला खिंडार

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, सांगलीचे माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, चंद्रकांत हुलवान यांच्यासह काही माजी नगरसेवक नव्याने इच्छुक उमेदवारांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

या संदर्भात बोलताना किशोर जामदार यांनी सांगितले की, “केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाने निधी देऊन महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेतला आहे.” आणखी १६ ते १७ माजी नगरसेवक पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश सोहळा पार होणार हे निश्चित होते.

दरम्यान, मिरज शहरातील काँग्रेसचे मुख्य नेतृत्व राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने, काँग्रेस पक्ष मोठ्या खिंडार पाडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, या पक्षाच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलतील असे मानले जात आहे.

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

Web Title: Maharashtra politics two former mayors and 12 corporators joined ncp big blow to congress news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Politics
  • Sangli

संबंधित बातम्या

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
1

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
2

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
3

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
4

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.