
Mahavikas Aghadi Congress out MNS Raj Thackeray BMC Elections 2025
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होत आहेत. यामुळे राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे. पालिका निवडणुकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाले असल्याचे दिसून आले आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचे उघड झाले. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. यानंतर राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये नवीन युती होण्याची देखील शक्यता आहे.
मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाकडून देखील त्यांची 25 वर्षांची सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची राज ठाकरेंसोबत सूत जुळलेले आहे. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा समोर घेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आले. मराठी भाषेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाची संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चर्चा रंगली. दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या मागे मराठी माणूस उभा राहिला. याच पाठिंब्याचे रुपांतर मतांमध्ये करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंचा प्रयत्न आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर अनेकदा ठाकरे बंधू हे एकमेकांच्या घरी, समारंभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले दिसून आले. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सूत जुळले असल्याची चर्चा सुरु झाली. राज ठाकरे यांनी मतचोरीच्या आरोप करत विरोधकांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन केले. याला शरद पवारांनी आधीपासून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला राष्ट्रवादी शरद पवार गटाने होकार दिला आहे. मात्र कॉंग्रेसकडून तीव्र विरोध केला जाणार आहे.
आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही – कॉंग्रेस
मनपा निवडणुकीतील आघाडी अथवा ठाकरे बंधुतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण मुंबईमध्ये काँग्रेसने एकला चलो रे चा नारा दिला आहे. राज ठाकरे यांच्या सहभागामुळे कॉंग्रेस बाजूला पडला आहे. कॉंग्रेसच्या स्पष्ट विरोधामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. कॉंग्रेस मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट शब्दांत मनससोबत जमणार नाही असे सांगितले. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही. हे आम्ही आज नाही, तर दोन महिन्यांपासून सांगतोय. आमची भाजपाशी किवा मनसेशी विचारसरणी जमण्यासारखीच नाहीये”, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचबरोबर काँग्रेस शिष्टमंडळाने याबाबत शरद पवार यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली. मतदार यादीच्या घोळाच्या संदर्भात आणि मतचोरीच्या संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता आणि मग निवडणूक का वेगळी लढवता?, असं शरद पवार यांचं मत आहे. त्यामुळे राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. या नांदीमुळे नवीन युती होत कॉंग्रेस बाहेर तर मनसे पक्ष महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता आहे.