"आरोपीला उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ...", करुणा मुंडे यांचा भाजपावर घणाघात
धाराशिव : नगराध्यक्ष हे पद मोठे पद आहे. मात्र या पदासाठी जामिनावर जेलबाहेर असलेल्या आरोपीला भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ दिले आहे. अशी घणाघाती टीका करुणा मुंडे यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) तुळजापूर येथे केली आहे. तुळजाभवानी मातेचे दर्शन करून मंदिराबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत तुळजापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक येथून स्वराज शक्ती सेनेच्या वतीने एक उमेदवारी दाखल केलेले उमेदवार आणि अन्य उपस्थित होते.
मोठमोठे भ्रष्टाचार केलेल्यांनाही मंत्री बनविण्यात आले आहे. आता नगराध्यक्षपदासाठीही भाजपाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यास उमेदवारी दिली आहे. भाजपा घराणेशाही विरोधी असल्याचा गवगवा ते करतात. मात्र भाजपाने तुळजापूरमध्ये एकाच घराण्यातील सहा – सहा लोकांना उमेदवारी दिली आहे. हे कसली घराणेशाही मोडतात. अशी टीका त्यांनी यावेळी केली. तुळजाभवानी मातेने तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जशी तालावर दिली होती. त्याच पद्धतीने मलाही आशीर्वाद द्यावा की, राज्यातील भ्रष्टाचाराचा डोंगर मी उलथवून टाकू शकेन. असे मागणे आपण मातेच्या चरणी मागितले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बातमी अपडेट होत आहे…






