Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे,’ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महाविकास आघाडीकडून क्रांती महामोर्चा

महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले असून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला.

  • By विवेक
Updated On: May 26, 2026 | 03:14 PM
Mahvikas Aaghadi protest over onion issue at Chandwad, Mahvikas Aaghadi protest, Onion prices,

Mahvikas Aaghadi protest over onion issue at Chandwad, Mahvikas Aaghadi protest, Onion prices,

Follow Us
Follow Us:
  • राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल
  • कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीकडून शेतकरी क्रांती महामोर्चा
  • हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सरकारविरोधात तीव्र संताप
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कांद्याचा खर्चहि निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यावरून आता महाविकास आघाडीकडून मोठे आंदोलन करण्यात आले असून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसी बळाचा वापर करून नेत्यांना ताब्यात घेतले, मात्र शेतकऱ्यांचा संघर्ष दडपून टाकता येणार नाही. “सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या शेतकरी महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खा. शोभाताई बच्छाव, खा. भगरे गुरुजी तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा विकत घ्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. परंतु सरकारचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे आरोप शेतकरी करत आहे.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिदे, आमदार रोहित पवार यांनीही शेतक-यांना मार्गदर्शन करताना भाजपा सरकारवर सडकून टीका केली.

“स्वतःला अभिनेत्री समजता का? तुम्हीसुद्धा अभिनेत्री व्हा आणि उमेदवारी अर्ज भरा,” सुशांत शेलार यांची सुषमा अंधारे यांच्यावर आगपाखड

काय म्हणाले अंबादास दानवे ?

आपल्या ट्विटर अकाउंटवर याबाबत ट्विट करत अंबादास दानवे म्हणाले, “कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे… शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे… नाशिक जिल्ह्यातील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेला क्रांती महामोर्चा मुंबई-आग्रा महामार्ग चौफुली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”

कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे…
शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे…
नाशिक जिल्ह्यातील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेला क्रांती महामोर्चा मुंबई-आग्रा महामार्ग चौफुली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो… pic.twitter.com/IUvjt8xpie — Ambadas Danve (@iambadasdanve) May 26, 2026

“हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कांद्याला योग्य दर, निर्यात बंदी उठविणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारने करावी अशी जोरदार मागणी केली. कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

पहिले PM मोदींना मुलीच्या लग्नाची दिली पत्रिका, मग Supriya Sule नी साधला पेट्रोल-डिझेलवरून निशाणा

Web Title: Mahvikas aaghadi protest over onion issue at chandwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Farmers Protest
  • Mahavikas Aghadi
  • MVA
  • Onion Prices

संबंधित बातम्या

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?
1

Online Onion Price : कांद्याचे भाव वाढले? ऑनलाईन मागवताना ‘या’ ॲपवर मिळेल चांगली ऑफर; Blinkit आणि Zepto मध्ये किती फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.