INDIA Bloc Meeting In Delhi: देशात लवकरच मोठे बदल.... इंडिया आघाडी मोठा डाव टाकण्याच्या तयारीत, सहा मोठे कार्यक्रम
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात, एसआयआरमधील (SIR) कथित मतचोरी आणि अनियमिततेच्या प्रकरणी इंडिया आघाडीची बैठक पार पडली. ज्ञानेश कुमार यांचे मनमानी कारभार चव्हाट्यावर आल्याने विरोधी पक्षांना आयतं कोलीत मिळालं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू आहे.
Delhi Riots 2020: दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद आणि शरजील इमाम यांना दिल्ली हायकोर्टाचा झटका
ही बैठक दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होत असून, या बैठकीला राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, सुप्रिया सुळे, मेहबूबा मुफ्ती व ओमर अब्दुल्ला यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित आहेत. जागावाटपावरून काँग्रेससोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव आजच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी आपल्या जागी दोन खासदारांना पाठवले. केजरीवाल यांनीही बैठकीतून माघार घेतली. स्टॅलिनही उपस्थित राहिले नाहीत. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्याची तयारी करत आहेत.
त्यापूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या (India Alliance) बैठकीला जमलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ज्या सुचना आणि सल्ले दिले आहेत, त्या सर्वांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. देशातील निवडणूक आयोग हा मोदी शाहांच्या हातचे बाहुले झाले आहे. ते फक्त बाहुले आहे. निवडणूक आयोगाच्या बाहुल्याच्या दोऱ्या तर मोदी-शहांच्या हातात आहे. तेच निवडणुकांची, मतांची चोरी करत आहेत आणि निवडणूका जिंकत आहेत. जिथे-जिथे लोकशाहीसाठी नेते आणि युवा तरूण लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनाही पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न या लोकांकडून सुरू आहे.
याबाबत आम्ही एका कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. इंडिया आघाडी, विरोधी पक्ष आणि संविधानाच्या हितासाठी, देशाच्या एकतेसाठी कटिबद्ध असलेल्या नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आम्ही आवाहन करत आहोत.
पहिला कार्यक्रम: २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर पर्यंत जिल्हास्तरावर सेव्ह डेमोक्रसी मार्च काढला जाईल, आणि निर्देशने केली जातील. या माध्यमातून नागरिकांना आपण हे का करत आहोत. याची पूर्ण माहिती द्यायची आहे.
DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
दुसरा कार्यक्रम: ६ ऑक्टोबरला सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांकडून निवडणूक आयोगावर मोर्चा काढला जाईल. या मार्चमध्ये कोणत्याही पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा सदस्य सामील होऊ शकतात. जे लोक या देशाची लोकशाही वाचवण्याची इच्छा बाळगतात, ते या मोर्चात सहभागी होऊ शकतात.
तिसरा कार्यक्रम म्हणजे, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतींसमोर एक प्रझेंटेशन करणार आहोत. आमच्या अडचणी आणि नागरिकांना त्रास देऊन आणि नष्ट करून जे लोक चोरीचे सरकार चालवत आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही एक प्रेझेंटेशन देणार आहोत.
चौथा कार्यक्रम एका मोठ्या रॅलीबद्दल आहेत. आजचे सरकार कशा पद्धतीने मतदारांची मते हिसकावत आहे, हक्का हिरावून घेत आहे आणि त्यांच्या जगण्याचा अधिकार आणि सरकार चालवण्याचा अधिकार, देशाचे रक्षण करण्याचा अधिकार सरकार कसे हिरावून घेत आहे, हे सांगण्यासाठी आम्ही पाच मोठ्या रॅली ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये काढल्या जाणार आहेत.
पाचवा कार्यक्रम म्हणजे, नोव्हेंबर ला दिल्लीत मोठी रॅली होणार आहे. या रॅलीमध्येही वोटचोरीचा मुद्दा उपस्थित केला जाईल, राहुल गांधी यांनी आधीच सर्व काही सांगितले आहे. पण आता सरकारकडून या गोष्टी बाहेर आल्या आहेत. तर आता इंडिया आघाडीकडून याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जाणार आहे.
सहावा कार्यक्रम: सर्वोच्च न्यायालयात एसआयआरसह निवडणुकीतील घोटाळ्यांशी संबंधित सर्व खटले तातडीने सुनावणीसाठी घ्यावेत, अशा सहा कार्यक्रम इंडिया आघाडीकडून आखण्यात आले आहेत.






