(8th Pay Commission: :फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 8 व्या वेतन आयोगाची सल्लामसलत प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे.देशातल्या लाखो सरकारी नोकरदारांचं सध्या एकच टेन्शन आहे. 8 वा वेतन आयोग. पगार वाढणार का? किती वाढणार? पेन्शनचं काय होणार? रोज कोणीतरी काहीतरी सांगतंय. व्हॉट्सॲपवर मेसेज फिरतायत. पण खरं काय आहे, ते आपण बघू. 8th Pay Commission Latest Update:
देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सध्या बहुप्रतिक्षित अशा 8 व्या वेतन आयोगाशी संबंधित प्रत्येक छोट्या-मोठ्या घडामोडींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहेत.
3 नोव्हेंबर 2025 ला हा आयोग बसवला गेला. प्रमुख आहेत न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. त्यांच्या हातात हा सगळा कारभार दिलाय. एकूण तीन माणसांची ही कमिटी आहे.या कमिटीला सरकारने 18 महिन्यांचा वेळ दिलाय. म्हणजे 18 महिन्यात त्यांनी पूर्ण अभ्यास करून आपला अहवाल सरकारला द्यायचा आहे. स्थापनेपासून एक वर्षापेक्षा जास्त वेळ झाला आहे. आता काम जोरात चालू आहे.
एक अतिशय व्यावहारिक आणि सर्वसमावेशक अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने, 8 व्या वेतन आयोगाच्या वतीने गेल्या वर्षभरात देशातील विविध राज्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत.
आयोग वाले फक्त दिल्लीत बसून नाहीयेत. ते गावोगावी फिरतायत. राज्यात जाऊन लोकांना भेटतायत. नवी दिल्ली, लडाख, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी दौरा केला.तिथे त्यांनी कामगार संघटनांशी बोलणं केलं. नॅशनल कौन्सिल – जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्स, अशा मोठ्या-मोठ्या संघटना आहेत. त्यांच्याशी सखोल चर्चा झाली.
हे का करतायत? तर कामावर असलेल्या लोकांच्या आणि पेन्शन घेणाऱ्या लोकांच्या अडचणी थेट त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाव्यात म्हणून खरी माहिती कुठे मिळेल? तर फक्त एकाच ठिकाणी. 8cpc.gov.in हीच ती अधिकृत वेबसाईट आहे. बाकी कुठलाही मेसेज खरा मानू नका.
PPF Investment: चहाच्या एका कपाएवढी बचत अन् मुलगा होईल करोडपती! PPF चा हा फॉर्म्युला जाणून घ्या
विविध संघटनांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या वतीने अनेक प्रमुख मागण्या आयोगासमोर अधिकृतपणे मांडण्यात आल्या आहेत.बैठकीत संघटनांनी आपल्या मागण्या ठेवून दिल्यात. त्यात सगळ्यात मोठी मागणी आहे फिटमेंट फॅक्टर वाढवा.
तर तुमचा आत्ताचा पगार कितीने गुणायचा, ते ठरवणारं गणित. तो जेवढा जास्त, तेवढा पगार जास्त.NC-JCM या संघटनेने 3.833 इतका फिटमेंट फॅक्टर असावा, असा प्रस्ताव दिलाय. म्हणजे पगार जवळपास पावणे-चार पटीने वाढवा, असं त्यांचं म्हणणं आहे.याशिवाय अजून मागण्या आहेत. किमान मूळ वेतन वाढवा. भत्ते वाढवा. पेन्शनच्या नियमात बदल करा. या सगळ्यावर आयोग आता अभ्यास करतोय. प्रशासकीय आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यावर पण त्यांचा भर आहे.अजून कोणतीच घोषणा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका.
सध्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारसी, पगारवाढ किंवा नवीन वेतन मॅट्रिक्सबाबत अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत.
Petrol Diesel Price Today: वीकेंडची भटकंती ठरवण्याआधी पाहा, इंधनाचे दर किती?
सोशल मीडियावर तर रोज नवीनच काहीतरी येतंय. आज पगार एवढा वाढला, उद्या फिटमेंट फॅक्टर ठरला, असं सगळं फिरतंय. पण हे सगळं खोटं आहे.अधिकृत सूत्रांनुसार स्पष्ट झाले आहे की, सध्याच्या घडीला वेतन, भत्ते किंवा फिटमेंट फॅक्टरबाबत कोणतीही अंतिम अधिकृत घोषणा झालेली नाही.
खरं सांगायचं तर, अजून काहीच ठरलेलं नाही. पगार किती वाढणार, भत्ता किती मिळणार, हे काहीच फायनल नाहीये.जेव्हा ही तीन माणसांची कमिटी आपलं काम संपवून अहवाल सरकारला देईल, तेव्हाच खरं चित्र समोर येईल. त्यामुळे उगाच कोणाच्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत वेबसाईटवर येईल, त्यालाच खरं माना.
Ans: 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8 व्या वेतन आयोगाची स्थापना झाली.
Ans: न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्ष आहेत.
Ans: आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.






