Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mallikarjun Kharge News: मुख्य निवडणूक आयुक्तांवर ६ गंभीर आरोप! मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला महाभियोगाचा प्रस्ताव

Mallikarjun Kharge News: खर्गे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणाने केली. संविधानाने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अधिकार मान्य नव्हता, असा आरोपही त्यांनी केला.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 31, 2026 | 06:32 PM
Mallikarjun Kharge, Gyanesh Kumar, INDIA Alliance, Public Impeachment, Election Commission,

Mallikarjun Kharge, Gyanesh Kumar, INDIA Alliance, Public Impeachment, Election Commission,

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रतिकात्मक महाभियोग प्रस्ताव
  • ज्ञानेश कुमार यांच्यावर सहा प्रमुख आरोप
  • २०२३ च्या कायद्यावर तीव्र आक्षेप
Mallikarjun Kharge News: काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (३१ ऑक्टोबर) इंडिया आघाडीच्या प्रतीकात्मक ‘जनतेच्या महाभियोग’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी प्रस्ताव मांडला. नवी दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या मॉक पार्लमेंटमध्ये खर्गे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर सहा गंभीर आरोप केले. Voting Theft & 13.2 Crore Deletions”: Kharge Demands Removal of CEC Gyanesh Kumar

ज्ञानेश कुमार यांच्यावर सहा आरोप

खर्गे यांनी आपल्या भाषणात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सहा प्रमुख आरोप केले. यामध्ये निवडणुकांमध्ये हेराफेरी करण्याचा कट रचणे, १३.२ कोटी मतदारांची नावे वगळणे, ECINET च्या माध्यमातून मतदार याद्यांवरील नियंत्रण केंद्रीत करणे, संसदेच्या मंजुरीशिवाय फॉर्म ६ मध्ये फेरफार करणे, इतर दोन निवडणूक आयुक्तांना निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या निर्देशानुसार काम करणे, असे सहा आरोप खर्गे यांनी यावेळी केले आहेत.

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally: ’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन

‘खासदार फोडले, सरकारे पाडली, आता मतांची चोरी’

केंद्रातील मोदी सरकारवर टिका करत ते म्हणाले की, “२०१४ पासून सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. खासदारांना विकत घेण्यात आले, राजकीय पक्ष फोडले, सरकारे पाडण्यात आली. इलेक्टोरल बॉण्ड्स, ईडी आणि सीबीआयचा वापर करण्यात आला. आता मतांची चोरी केली जात आहे. आमच्याकडे मतचोरीची शेकडो उदाहरणे आहेत.”

मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित २०२३ च्या कायद्यावरही खर्गे यांनी आक्षेप घेतला. डिसेंबर २०२३ मध्ये विरोधी पक्षांचे १४५ खासदार निलंबित असताना हा कायदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या कायद्यामुळे निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण मिळत असल्याची टीकाही त्यांनी केली.

संजय गायकवाडांच्या पुतळ्याचे कुत्र्यांनी तोडले लचके! युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन, २४ तासांत माफीचा इशारा

‘आमचा वैयक्तिक विरोध नाही, निष्पक्ष निवडणुका हव्यात’

खर्गे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणाने केली. संविधानाने नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अधिकार मान्य नव्हता, असा आरोपही त्यांनी केला. “मुख्य निवडणूक आयुक्तांविषयी आमच्या मनात कोणताही वैयक्तिक राग नाही. आम्हाला केवळ निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार काम करत आहेत,” असे खर्गे म्हणाले.

आज मतदानाचा अधिकार धोक्यात असून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी विरोधक आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीचा हा प्रतीकात्मक महाभियोग कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (SIR) प्रश्न उपस्थित करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

𝐑𝐞𝐬𝐨𝐥𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐅𝐨𝐫 𝐓𝐡𝐞 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐈𝐦𝐩𝐞𝐚𝐜𝐡𝐦𝐞𝐧𝐭 𝐎𝐟 𝐌𝐫. 𝐆𝐲𝐚𝐧𝐞𝐬𝐡 𝐊𝐮𝐦𝐚𝐫, 𝐂𝐡𝐢𝐞𝐟 𝐄𝐥𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐂𝐨𝐦𝐦𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐞𝐫 𝐎𝐟 𝐈𝐧𝐝𝐢𝐚. 𝐓𝐇𝐄 𝐒𝐈𝐗 𝐂𝐇𝐀𝐑𝐆𝐄𝐒 𝐀𝐆𝐀𝐈𝐍𝐒𝐓 𝐇𝐈𝐌 👇 1️⃣ Conspired to Steal Elections 2️⃣ Deleted 13.2 Crore Voters 3️⃣ Rewrote Form 6 Without Parliamentary Oversight or Knowledge 4️⃣ Seized the Electoral Rolls Through ECINET 5️⃣ Shut Out the Other Two Commissioners 6️⃣ Acted at the Behest of Modi and Shah : Congress President Shri @kharge at the Public Impeachment of CEC Gyanesh Kumar — Congress (@INCIndia) October 31, 2026
💡

Frequently Asked Questions

  • Que: मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कोणते मुख्य आरोप केले आहेत?

    Ans: खर्गे यांनी निवडणुकांमध्ये हेराफेरीचा कट, १३.२ कोटी मतदारांची नावे वगळणे, ECINET द्वारे मतदार याद्यांवर नियंत्रण, संसदेच्या मंजुरीशिवाय फॉर्म ६ मध्ये फेरफार करणे, इतर आयुक्तांना दूर ठेवणे आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्देशानुसार काम करणे हे ६ प्रमुख आरोप केले आहेत.

  • Que: हा महाभियोग कार्यक्रम कुठे आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडला?

    Ans: हा प्रतीकात्मक 'जनतेचा महाभियोग' कार्यक्रम दिल्लीतील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी पार पडला असून, याचे अध्यक्षस्थान माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी भूषवले.

  • Que: खर्गे यांनी २०२३ च्या निवडणूक आयुक्त नियुक्ती कायद्यावर काय आक्षेप घेतला?

    Ans: विरोधी पक्षांचे १४५ खासदार निलंबित असताना हा कायदा मंजूर करण्यात आला होता आणि यामुळे निवडणूक आयुक्तांना अवाजवी कायदेशीर संरक्षण मिळत आहे, असा आक्षेप खर्गे यांनी घेतला.

Web Title: Mallikarjun kharge lists 6 charges against cec gyanesh kumar demands removal as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Gyanesh Kumar
  • INDIA Alliance
  • Mallikarjun Kharge

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally:’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन
1

Rahul Gandhi Ramlila Maidan Rally:’उद्या भेटू’ म्हणत राहुल गांधींनी शेअर केला रामलीला मैदानातील सभेचा नकाशा आणि प्लॅन

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?
2

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?

India Alliance Rally 1 November: ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत CJP सहभागी होणार; आशुतोष रांका, राहुल गांधीं काय म्हणाले?
3

India Alliance Rally 1 November: ‘इंडिया’ आघाडीच्या रॅलीत CJP सहभागी होणार; आशुतोष रांका, राहुल गांधीं काय म्हणाले?

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत
4

ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.