शेतकऱ्यांच्या वक्तव्यावरून युवक काँग्रेस आक्रमक
सातारा : शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह, हीन वक्तव्य केल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन केले. कराड येथे युवक काँग्रेसच्यावतीने आमदार गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्यावर टाकण्यात आला. त्यानंतर भटक्या कुत्र्यांनी या प्रतिकात्मक पुतळ्याचे लचके तोडल्याचे दाखवत युवक काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या नेत्यांना आता अशाच पद्धतीने जाब विचारला जाईल,” असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी दिला.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे महेश करचे म्हणाले की, महाराष्ट्राचा शेतकरी दिवस-रात्र कष्ट करून देशाचे पोट भरतो. मात्र, त्याच शेतकऱ्यांबद्दल हीन, असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणा, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी आधीच त्रस्त असताना त्यांच्या दुःखाची चेष्टा करणे अत्यंत संतापजनक आहे.
“महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांनी येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा युवक काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन करेल. शेतकऱ्यांबद्दल हीन वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना यापुढे रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल,” असा इशारा करचे यांनी दिला.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. “माफी मागितली नाही तर आमदारांच्या अंगावर भटकी कुत्री सोडून, तोंडाला काळे फासून तीव्र निषेध व्यक्त करण्यास युवक काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही,”
दरम्यान, या आंदोलनात युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पवार, एनएसयूआय अध्यक्ष मुबीन बागवान, माण तालुकाध्यक्ष महेश करचे, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष चैतन्य पाटील, जितू यादव, तालुकाध्यक्ष देवदास माने, दिग्विजय जमाले, समीर इनामदार युवक काँग्रेसचे पदाधिकारी, व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी महायुतीचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही नेत्याला यापुढे माफ केले जाणार नाही, असा निर्धार युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
Ans: सातारा जिल्ह्यातील कराड येथे युवक काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केले.
Ans: आमदार संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्यावर ठेवण्यात आला. भटक्या कुत्र्यांनी पुतळ्याचे लचके तोडल्याचे दाखवत कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.
Ans: येत्या २४ तासांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला.






