Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation Update: ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलन तापणार! जरांगे पाटलांकडून मुंबई आंदोलनाची घोषणा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने ठोस तोडगा न काढल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे १५ सप्टेंबरपासून आंदोलकांचा ताफा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु होणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 12, 2026 | 04:53 PM
Manoj Jarange Patil, Azad Maidan Protest Mumbai,

Manoj Jarange Patil, Azad Maidan Protest Mumbai,

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील यांचा १५ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानाकडे कूच करण्याचा निर्णय.
  • अंतरवाली सराटी येथील बैठकीत मुंबईत बेमुदत आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा.
  • प्रवासादरम्यान पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ४ ठिकाणी मुक्कामाचे नियोजन.
Maratha Reservation Update: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली. राज्य सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने आता मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे प्रवास सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले.

मुंबईकडे जाताना टप्प्याटप्प्याने मुक्काम करण्यात येणार असून पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ठिकाणी मुक्काम करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, मुंबईत आंदोलन न करण्याचं

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारकडून काही निर्णय जाहीर करण्यात आले असले तरी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा आरक्षणाशी संबंधित प्रमुख मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आंदोलन मुंबईत करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

मुंबईकडे जाताना आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहनही जरांगे यांनी समर्थकांना केले आहे. दगडफेक किंवा जाळपोळ न करता शांततेने आंदोलन करावे, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनासाठी येऊ न शकणाऱ्या मराठा बांधवांनी मार्गावर उपस्थित राहून आशीर्वाद, पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे

जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला रोखण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यास नकार दिला आहे. शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर असल्याचेही नमूद केले आहे.

आता १५ सप्टेंबरपासून जरांगेंचा मुंबईकडे प्रवास, मार्गातील मुक्काम आणि आझाद मैदानावरील आंदोलन याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता पुन्हा निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.

‘या’ ४ ठिकाणी असणार मुक्काम; जरांगेंच्या प्रवासाचे नियोजन

अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर मुंबईला पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने मुक्काम करत आंदोलक पुढे सरकणार आहेत:

पहिला मुक्काम: पाटोदा

दुसरा मुक्काम: श्रीगोंदा

तिसरा मुक्काम: हडपसर (पुणे)

चौथा मुक्काम: खोपोली

खोपोलीतील मुक्कामानंतर जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईत दाखल होऊन आझाद मैदानावर बेमुदत आंदोलनाला बसणार आहेत.

 

Web Title: Manoj jarange patil announces mumbai azad maidan protest from september 15

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation : मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, मुंबईत आंदोलन न करण्याचं आवाहन
1

Maratha Reservation : मनोज जरांगेंपेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; बावनकुळेंचं मोठं वक्तव्य, मुंबईत आंदोलन न करण्याचं आवाहन

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा
2

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर संजय राऊत यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…
3

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर संजय राऊत यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
4

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.