Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manoj Jarange Patil: ‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाची घोषणा केली आहे. मुंबईला पोहोचेपर्यंत सरकारला मराठा समाजाच्या मागण्या मार्गी लावण्याची संधी असल्याचे त्यांनी म्हटले. मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेले असे समजा, असा इशाराही त्यांनी दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 12, 2026 | 02:32 PM
‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

‘मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखल्यास भाजपपासून मतदान दूर गेलेच समजा’; जरांगे पाटलांचा थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • मराठा आरक्षणासाठी ‘निर्णायक लढाई’
  • जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार
  • आझाद मैदानात बेमुदत उपोषण
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा निर्णायक आंदोलनाची घोषणा केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून, मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणेही जाहीर केली आहेत. यावेळी सरकारला आणखी एक संधी देत त्यांनी भाजपला मतदानासंदर्भात थेट इशारा दिला.

‘सरकारला ही चौथी संधी’

आजपासून मुंबईत पोहोचेपर्यंत सरकारकडे वेळ असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारला तयारीची संधी देत असून ही चौथी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री अंतरवाली सराटीत येऊन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत भूमिका स्पष्ट करू शकतात, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगेंच्या आंदोलनावर संजय राऊत यांनी केलं मोठं विधान; म्हणाले…

दरम्यान, मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे राजकीय परिणाम होतील, असा इशारा त्यांनी दिला. “मुंबईत येण्यापासून मराठ्यांना रोखल्यास भाजपपासून मतदान लांब गेले म्हणून समजा,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

घोषणा करताना जरांगे पाटील भावूक

मराठा आरक्षणासाठी मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा करताना जरांगे पाटील भावूक झाले. बोलताना त्यांना हुंदका फुटला आणि डोळ्यांत अश्रू आले. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला अनेक संधी दिल्या, मात्र आता मुंबईत आंदोलनासाठी जाण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. ही लढाई शेवटची आणि निर्णायक असल्याचा दावा करत त्यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. घरात न थांबता या लढ्याचे साक्षीदार व्हा आणि आंदोलनाच्या मार्गावर एकत्र या, असे आवाहनही त्यांनी केले.

‘दगडफेक, जाळपोळ नको’

मुंबईकडे जाताना तसेच आंदोलनानंतर परत येईपर्यंत संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना जरांगे पाटील यांनी समर्थकांना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत दंगा, दगडफेक किंवा जाळपोळ करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

असा असेल मुंबई आंदोलनाचा मार्ग

मराठा आरक्षणाच्या अंतिम लढ्यासाठी जरांगे पाटील यांनी मुक्काम करत मुंबईत पोहोचण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे, त्यानंतर अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर, तर चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असणार आहे.

त्यानंतर मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार असून सकाळी १० वाजता आझाद मैदानावर आंदोलन सुरू करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारने मुंबईत पोहोचण्यापूर्वी निर्णय घ्यावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते आणि जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबत प्रशासन काय नियोजन करते, याकडे लक्ष लागले आहे.

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

Web Title: Manoj jarange patil warns bjp over maratha reservation announces mumbai march azad maidan protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या
1

Mumbai Metro: गणेशभक्तांसाठी खुशखबर! रात्री १२.३० पर्यंत धावणार मुंबई मेट्रो; १० ते १५ अतिरिक्त फेऱ्या

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!
2

Maratha Reservation: राज्य सरकारने चर्चेचे दरवाजे बंद केल्यानेच जरांगे मुंबईत; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल!

मराठा आरक्षणावर राजेंद्र कोंढरेंचा जरांगेंना सल्ला; विखे-पाटलांच्या उपसमितीवरही निशाणा
3

मराठा आरक्षणावर राजेंद्र कोंढरेंचा जरांगेंना सल्ला; विखे-पाटलांच्या उपसमितीवरही निशाणा

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप
4

Laxman Hake : ‘अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,’ जरांगेंना पाठिंबा दिल्याने लक्ष्मण हाकेंचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.