
Manoj Jarange, Devendra Fadnavis, ED Notice,
आपल्या आजूबाजूच्या जवळच्या व्यक्तींना ईडीच्या नोटिसा दिल्या जात असल्याचा दावा करत, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मला आता संशय यायला लागला आहे. माझ्या आजूबाजूच्या जवळच्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे?” असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.ईडीला एक दर्जा आहे. अंतरवाली सराटीतील लोकांना ईडीची नोटीस पाठवली, तर ईडीची इज्जत काय राहिली?” असा सवाल त्यांनी केला. देशभरातील मोठ्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करून अंतरवालीतील लोकांची चौकशी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींवर दबाव आणण्यासाठी ईडीच्या नोटिसांचा वापर केला जात आहे. “माझ्याबरोबर काम करतात म्हणून फडणवीसांनी कुणालातरी हाताखाली धरायचे आणि आंदोलनाला सपोर्ट करू नये म्हणून ईडीच्या नोटिसा द्यायच्या. याचा अर्थ यांना आंदोलन बंद पाडायचे आहे,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. “मला साथ देणाऱ्यांना गार करायचे. आंदोलन बंद पाडण्यासाठी सर्व सुरू आहे,” असा आरोप करत त्यांनी मराठा समाजाला संबंधितांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.
ईडीच्या नोटिसा मिळालेल्या व्यक्तींशी आपली चर्चा झाल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. “ईडीच्या नोटिसा आलेल्यांनी आताच पदाला लाथ मारली आहे. त्यांच्याजवळ काहीच नाही. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. नोटिसा मिळालेल्या व्यक्तींकडे संबंधित व्यवहारांचा हिशोब असल्याचे सांगत तो हिशोब तयार ठेवण्यात आला असून तो सादरही करण्यात आल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. दरम्यान, जरांगे यांच्या या आरोपांवर सरकार किंवा संबंधित तपास यंत्रणेकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.
China News : मध्यपूर्वेच्या संघर्षात चीनची एंट्री; शांततेसाठी BRICS देशांसोबत मध्यस्थीची तयारी
ईडीच्या नोटिसा मिळालेल्या व्यक्तींनी पद सोडले असून ते चौकशीला सामोरे जाण्यास आणि जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “आमच्याकडे पूर्ण हिशोब आहे,” असेही त्यांनी सांगितले. याचवेळी जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा देत त्यांच्या ‘पाहुण्यां’विरोधातही ईडीकडे तक्रारी करण्याचा उल्लेख केला. “फडणवीस, तुमच्या पाहुण्यांना ईडीच्या नोटिसा जातील. त्यांनाही ईडीच्या नोटिसा जातील. आमचेही लोक अर्ज देतील. ईडीला फक्त अंतरवालीच्या चौकशी करायच्या आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.