Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं,” मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील पुन्हा भडकले!

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात मात्र आठ महिने उलटून गेले तरी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये.

  • By विवेक
Updated On: May 15, 2026 | 07:29 PM
Manoj Jarange Patil Live: "... रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करणार"; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Manoj Jarange Patil Live: "... रात्री 9 पर्यंत मुंबई खाली करणार"; आझाद मैदानावरून जरांगे पाटलांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले
  • देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अश्या शब्दांत व्यक्त केला संताप
  • आंदोलनाची नवी तारीख होणार जाहीर
मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही प्रत्यक्षात मात्र आठ महिने उलटून गेले तरी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेले नाहीत, अश्या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आपला संताप व्यक्त करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अश्या शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील आज (१५ मे) जालन्यात बोलत असताना मराठा आरक्षण मुद्द्यावरून राज्यसरकारवार चांगलेच ताशेरे ओढले. सातारा गॅझेटचा जीआर एक महिन्यात काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ज्यांना कुणबी पुरावा सापडला त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही, तसेच शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नाही, असा आरोप जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

रुपाली चाकणकरांच्या अशोक खरातसोबतच्या फोटोवरून अंजली दमानिया भडकल्या, SIT कडून चौकशीची मागणी

फडणवीसांवर केली सडकून टीका

यावेळी बोलत असताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “फडणवीसांकडून मराठा समाजाला जास्तीत जास्त त्रास देण्याचे काम चालू आहे. यांना मत आणि नेते मराठयांचे लागतात, पण मराठा समाजातील मुलं मोठी होऊ नये अशी त्यांची भूमिका दिसते,” असे ते यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आंदोलन झाल्यानंतर हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाल्यावेळी सरकारच कौतुक केलं होत, त्यानंतर १०८ प्रमाणपत्रांचे वितरण झाले. मात्र सातारा गॅझेटबाबत दिलेलं आश्वासन अजून पूर्ण झालेलं नाही. आता आम्ही पाहतोच हा जीआर कसा निघत नाही,” अश्या शब्दात त्यांनी राज्य सरकारला सज्जड दम दिला आहे.

ते पुढे म्हणाले, “अनेक मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडूनसुद्धा संबंधितांना जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीयेत. त्यामुळे अनेक मराठा कुटुंबे अडचणीत आली आहेत. शिंदे समिती रेकॉर्ड शोधण्याच्या प्रक्रियेत अपेक्षित गती नसल्याने समाजात नाराजी वाढत चालली आहे,” असे ते म्हणाले.

आंदोलनाची नवी तारीख होणार जाहीर

यावेळी जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा नव्याने आंदोलन करण्याचे स्पष्ट केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचं स्पष्ट करत जरंगे पाटील यांनी येत्या शनिवारी आंदोलनाची नवी तारीख जाहीर केली जाईल हे स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी सरकारला भावनिक आवाहन करत ,” आमची लेकरं सोन्यासारखी आहेत, सरकारने आणखी बळी घेऊ नयेत,” असे सांगितले आहे.

“माझ्याबाबत अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या,” ED चौकशीनंतर रुपाली चाकणकरांचे मोठे वक्तव्य

Web Title: Manoj jarange patil slams cm devendra fadnavis over maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Arakshan

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले
2

‘दिमागी नक्षलवाद’च्या टीकेवरून फडणवीस-सपकाळ आमनेसामने; सोनिया गांधींच्या व्हिडिओवरून राजकारण तापले

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन
3

‘मुख्यमंत्री फेलोशिपमुळे प्रशासनाला नव्या पिढीच्या विचारांची जोड’; फेलोंना देवेंद्र फडणवीसांचे परिवर्तनाचे आवाहन

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
4

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.