Maratha Manoj Jarange Patil vs OBC Laxman Hake dispute over Devendra fadnavis Criticism
पुणे : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 25 जानेवारीला जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण देखील केले होते. सहा दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी साळखी उपोषणाची घोषणा केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह 9 वाळू माफियांना तडीपार करण्यात आले आहे. या 9 आरोपींपैकी 6 जण हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते. या कारवाईमुळे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता. यावरुन आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला वाळू माफियांचा सपोर्ट असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाच्या वेळी जरांगे पाटील ज्यांची गाडी वापरतात ती गाडी देखील वाळू माफियांची आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट आहे. वाळू माफियांचा सपोर्ट घेणं न घेणं हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल. कायद्याचा भंग करतील महसूल बुडवतील त्यांना कायदा बघून घेईन. अशा वाळू माफियांच्या जीवावर जरांगे आंदोलन करून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर घातक आहे, असे मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांवर कठोरात कठोर शिक्षा करायला हवी. हे षडयंत्र रचणारा ढसांच्या भाषेत बोलायचं झालं तर याचा आका कोण होता या आकाचा पहिल्यांदा शोध व्हायला हवा. ‘आका’ हा शब्द या महाराष्ट्रातील बिनीचा शब्द आहे या आकाचा शोध व्हायलाच हवा. वाळू ओढणाऱ्या महसूल बुडवणाऱ्या गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीस यांनी आमंत्रण दिलं होतं का? या वाळू माफियांना शिक्षा झालीच पाहिजे. बीड शहर जायला जात होतं त्यावेळीची माणसं, अंतरवाली सराटी मध्ये गोळीबार करणारी माणसं, दंगल घडवणारी माणसं, ही माणसं कोण आहेत यांच्यावर मकोका पेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर फक्त तडीपारची कारवाई करून चालणार नाही, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनोज जरांगे पाटील हे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करुन जोरदार टीका करत आहे. याचा देखील लक्ष्मण हाकेंनी खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, “नदीतील वाळू ओढायला थोडीच फडणवीस आणि सांगितलं होतं. बीडमध्ये गोळीबार करायला, लोकप्रतिनीधीच घर जाळायला थोडीच फडणवीस यांनी सांगितलं होतं. अंतरवाली सराटी तसेच दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडच फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यांच्यावर काय कारवाई व्हायलाच हवी. ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना, दहा टक्के एसीबीसी आरक्षणाला ओबीसीचा विरोध थोडीच होता. ओबीसीचा एवढेच म्हणणं आहे की ओबीसी अंतर्गत घुसखोरी करू नका. घुसखोरी केली तर ओबीसीचे आरक्षण संपेल ही आमची न्याय मागणी होती. ओबीसीची बाजू मांडणाऱ्या प्रत्येक नेत्यावर या नेत्यांनी फिजिकल अटॅक केले आहेत. ज्या लोकांवर तडीपारची कारवाई झाली त्याच लोकांनी पुण्यामध्ये माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर हल्ला करणारे त्याच परिसरातील लोक होती. हे सर्व माहिती पोलिसांकडे आहे. या लोकांनी फक्त वाळू ओढली नाही तर दोन समाजांमध्ये ते निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला आहे,” असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.